Lenovo LOQ Gaming Laptop : Lenovo कंपनीने भारतात आपल्या नवीन LOQ गेमिंग लॅपटॉपची (LOQ gaming laptop) घोषणा केली आहे. हा लॅपटॉप NVIDIA च्या अत्याधुनिक GeForce RTX 50 सीरीज GPUs सह येतो.
लाँच करण्यात आलेले हे मॉडेल सामान्य गेमर्स आणि क्रिएटर्ससाठी उत्कृष्ट कामगिरी आणि कस्टमायझेशनचे पर्याय देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. Lenovo LOQ gaming laptop ची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
Lenovo LOQ gaming laptop चे स्पेसिफिकेशन्स
नवीन LOQ लॅपटॉपमध्ये ग्राहकांना AMD Ryzen 7 250 किंवा Intel Core i7-14700HX CPU पर्यंतचे प्रोसेसर निवडण्याचा पर्याय मिळतो. यासोबतच NVIDIA GeForce RTX 5060 8GB पर्यंतची ग्राफिक्स कार्ड (Graphics card) उपलब्ध आहे.
लॅपटॉप 32GB पर्यंतच्या रॅम (क्षमतेसह येतात आणि यात 165Hz पर्यंतच्या हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेचा समावेश आहे. परफॉर्मेंस सुधारण्यासाठी Lenovo च्या LA1 AI चिपचा वापर करण्यात आला आहे.
डिझाइन आणि इतर वैशिष्ट्ये
या लॅपटॉपमध्ये 5MP चा वेबकॅम आहे, ज्यात ई-शटरचापर्याय उपलब्ध आहे. पूर्ण आकाराच्या कीबोर्डमध्ये 24-झोन RGB लाईटिंग आणि 1.6mm की-ट्रॅव्हल आहे. हेवी वर्कलोडमध्येही लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी Lenovo च्या Hyperchamber cooling system चा वापर करण्यात आला आहे.
Lenovo LOQ gaming laptop ची किंमत
नवीन Lenovo LOQ लॅपटॉपची किंमत ₹1,09,990 पासून सुरू होते. लॅपटॉप Lenovo.com वरून खरेदी करता येतील. ‘कस्टम-टू-ऑर्डर’ मॉडेलसाठी 15 ते 20 दिवसांमध्ये डिलिव्हरीची वेळ लागेल. यासोबत 1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी आणि ॲक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन (ADP) उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, 3,999 रुपये भरून 3 वर्षांच्या वॉरंटीचे अपग्रेडही खरेदी करता येते.