World’s Longest Car: जगातील सर्वात लांब आणि आलिशान कार म्हणून ओळखली जाणारी ‘द अमेरिकन ड्रीम’ ही लिमोझीन तिच्या अविश्वसनीय फीचर्समुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार 1986 मध्ये कॅलिफोर्नियातील बर्बँक येथे प्रसिद्ध कार डिझायनर जे. ओहरबर्ग यांनी तयार केली होती.
ही केवळ कार नसून, 100 फूट लांबीचा चालता-फिरता राजवाडाच आहे, ज्यात स्वीमिंग पूल, जकूझी, बाथटब, मिनी गोल्फ क्षेत्र आणि हेलिपॅडसारख्या सुविधांचा समावेश आहे. यात एकाच वेळी 75 हून अधिक लोक आरामात प्रवास करू शकतात.
कारची अद्भुत रचना
सुरुवातीला ही लिमोझीन 60 फूट लांब होती. यात 24 चाके आणि दोन V8 इंजिन वापरले होते. त्यानंतर जे. ओहरबर्ग यांनी तिची लांबी 100 फुटांपर्यंत वाढवून तिला 2003 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) स्थान मिळवून दिले.
कारच्या आतमध्ये असलेली रचनाही खास आहे. मागील भागात स्वीमिंग पूल आणि छोटा गोल्फ क्षेत्र आहे. तिच्यावरील हेलिपॅडची सोय तिला अतिविशिष्ट बनवते. या लिमोझीनचा इंटिरियर अशा प्रकारे डिझाइन केले आहे की 75 प्रवासी यात सहज प्रवास करू शकतील.
जीर्णोद्धाराचा प्रवास
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने ही लिमोझीन गंजून आणि तुटलेले भाग यामुळे पूर्णपणे खराब झाली होती. अखेरीस न्यूयॉर्कच्या एका संस्थेने या ऐतिहासिक कारच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.
या पुनर्संचयित प्रकल्पाला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागला आणि शिपिंग, साहित्य आणि मजुरीसह 2.5 लाख डॉलरहून अधिक खर्च आला. तज्ञांच्या टीमने एकत्र येऊन या कारला पुन्हा जिवंत केले.
आता ही लिमोझीन डेझरलँड पार्क ओरलँडोच्या ऑटो म्युझियममध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या कारची भव्यता दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा – Sabarimala Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शबरीमला मंदिराला भेट; ‘अय्यप्पा स्वामीं’चे दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती