Maharashtra Surveyor Recruitment 2025: राज्यातील भूमी अभिलेख विभागात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाने गट क संवर्गातील भूकरमापकांच्या (Surveyor) 903 रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही पदे सरळसेवा पद्धतीने (Direct Recruitment) भरली जाणार असून, यासाठी 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण 1,160 पदे रिक्त असून, त्यापैकी 903 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे.
भरती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025.
- परीक्षा: 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
उमेदवारांना त्यांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील.
शैक्षणिक पात्रता
भूकरमापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांमध्ये खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
- मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक (Diploma in Civil Engineering).
- माध्यमिक शालांत परीक्षेनंतर (SSC) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्रधारक (ITI Surveyor).
विभागनिहाय रिक्त पदांचा तपशील
राज्यात भरल्या जाणाऱ्या 903 पदांचा विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
- कोकण (मुंबई) विभाग: 259 पदे
- छत्रपती संभाजीनगर विभाग: 210 पदे
- नाशिक विभाग: 124 पदे
- अमरावती विभाग: 117 पदे
- नागपूर विभाग: 110 पदे
- पुणे विभाग: 83 पदे
निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि अखेरीस विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल.
हे देखील वाचा – “तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?”, गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर पुन्हा टीका