Home / लेख / नवीन Mahindra Bolero 2025 लाँच; टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ‘स्टेल्थ ब्लॅक’ रंगात दमदार अपडेट्स, जाणून घ्या किंमत

नवीन Mahindra Bolero 2025 लाँच; टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ‘स्टेल्थ ब्लॅक’ रंगात दमदार अपडेट्स, जाणून घ्या किंमत

Mahindra Bolero 2025 Price: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने त्यांची सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वसनीय SUV Mahindra Bolero 2025...

By: Team Navakal
Mahindra Bolero 2025 Price

Mahindra Bolero 2025 Price: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने त्यांची सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वसनीय SUV Mahindra Bolero 2025 ला नवीन अवतार भारतीय बाजारात लाँच केले आहे. या अद्ययावत मॉडेलला काही बदल बदल आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कंपनीने Bolero चे एक नवीन B8 (B8) व्हेरिएंट देखील बाजारात आणला आहे.

या 2025 Mahindra Bolero ची एक्स-शोरूम किंमत 7 लाख 99 हजार रुपये पासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9 लाख 69 हजार रुपये पर्यंत जाते.

किंमत आणि व्हेरिएंट्स (एक्स-शोरूम):

व्हेरिएंटकिंमत (रुपये)
Bolero B47,99,000
Bolero B68,69,000
Bolero B6(O)9,09,000
Bolero B8 (नवीन)9,69,000

Mahindra Bolero 2025 चे फीचर्स

नवीन Bolero मध्ये यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कोणते बदल झाले आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत:

एक्सटीरियर बदल:

  • यात नवीन 5-स्लॅट क्रोम ग्रिल देण्यात आले आहे, ज्यामुळे फ्रंट लूक आकर्षक दिसतो.
  • B6 ट्रिमपासून आता फॉग लॅम्प्स दिले गेले आहेत.
  • टॉप-स्पेक B8 ट्रिममध्ये 16-इंचाचे नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
  • याला स्टेल्थ ब्लॅक नावाचा एक नवीन रंग पर्याय देखील मिळाला आहे.

इंटीरियर आणि फीचर्स:

  • 2025 Bolero मध्ये पहिल्यांदाच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे, मात्र ते अँड्रॉइड ऑटो किंवा अ‍ॅप्पल कारप्लेला सपोर्ट करत नाही.
  • लेदरटेट अपहोल्स्ट्री आणि USB-C टाईप चार्जिंग पोर्ट सारख्या सुविधा जोडण्यात आल्या आहेत.
  • सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंटमध्ये ड्यूल एअरबॅग्ज कायम ठेवण्यात आले आहेत.
  • नवीन B8 व्हेरिएंटमध्ये डायमंड कट अलॉय व्हील्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री मिळते.

इंजिन आणि मेकॅनिकल सेटअप

  • नवीन Mahindra Bolero च्या मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • यात पूर्वीप्रमाणेच 1.5-लीटर, 3-सिलिंडर डिझेल इंजिन वापरले आहे, जे 76hp ची पॉवर आणि 210Nm चा टॉर्क निर्माण करते.
  • ही रियर-व्हील-ड्राइव्ह एसयूव्ही 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स सह येते.

महिंद्राने दावा केला आहे की, या अपडेट्समुळे वाहनाची राइड आणि हाताळणीचा अनुभव अधिक चांगला झाला आहे.

हे देखील वाचा – MPSC Group C Exam: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 938 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या