Maruti Grand Vitara : भारतीय बाजारात मिड साइज एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Grand Vitara ला मोठी मागणी आहे. विशेषतः, या एसयूव्हीचा सीएनजी (CNG) प्रकार इंधन बचतीमुळे ग्राहकांना खूप आकर्षित करत आहे.
जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून ही गाडी घरी आणू इच्छित असाल, तर बँकेच्या कर्जावरतुम्हाला किती मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल, याचे संपूर्ण आर्थिक गणित येथे समजून घ्या.
Maruti Grand Vitara CNG (Delta) ची ऑन-रोड किंमत
Maruti Grand Vitara च्या सीएनजी प्रकारात ‘Delta’ हे मॉडेल उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे.
तुम्ही ही गाडीखरेदी केल्यास, एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त तुम्हाला सुमारे 1.30 लाख रुपयांचा नोंदणी शुल्क, सुमारे 60 हजार रुपयांचा विमा आणि अंदाजे 13 हजार रुपयांचे टीसीएस शुल्क भरावे लागेल. या सर्व करांसह या मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 15.03 लाख रुपये होते.
2 लाख डाउन पेमेंटवर कर्जाचे आणि EMI चे गणित
जर तुम्ही Grand Vitara CNG च्या खरेदीसाठी 2 लाख रुपये डाउन पेमेंट केले, तर उर्वरित सुमारे 13.03 लाख रुपये तुम्हाला कार कर्ज म्हणून बँकेकडून घ्यावे लागतील.
बँकेने जर तुम्हाला 7 वर्षांसाठी (84 महिने) 9 टक्के व्याजदराने 13.03 लाख रुपयांचे कर्ज दिले, तर तुमचा मासिक हप्ता (EMI) फक्त 20,968 रुपये असेल. पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला ही रक्कम दरमहा भरावी लागेल.
गाडीची एकूण किंमत आणि व्याजाचा बोजा
7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज घेतल्यास, तुम्हाला व्याजापोटी सुमारे 4.58 लाख रुपये अतिरिक्त भरावे लागतील. या कर्जाची रक्कम, ऑन-रोड किंमत आणि व्याज मिळून तुम्हाला ही कार एकूण सुमारे 19.6 लाख रुपयांना पडेल. तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Grand Vitara चा नक्कीच विचार करू शकता.
हे देखील वाचा – बजेट 5G स्मार्टफोनची प्रतीक्षा संपली! अवघ्या 11 हजारात लाँच झाला Vivo चा फोन; पाहा फीचर्स









