Maruti S-Presso Price: जीएसटीमधील बदलांमुळे भारतीय बाजारातील गाड्यांच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारने आता ऑल्टो K10 (Alto K10) ला मागे टाकून देशातील सर्वात स्वस्त कारचा मान मिळवला आहे.
जीएसटी 2.0 (GST 2.0) मधील सुधारणांनंतर मारुतीने तिच्या एंट्री-लेव्हल कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. याचा सर्वात जास्त फायदा एस-प्रेसोला झाला असून, तिच्या काही व्हेरियंट्सवर तब्बल 1.20 लाख रुपयांपर्यंतची कपात झाली आहे.
एस-प्रेसो वि. ऑल्टो K10: किमतीतील फरक
जीएसटी 2.0 नंतर आता एस-प्रेसोची सुरुवातीची किंमत फक्त 3.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे, तर ऑल्टो K10 ची सुरुवातीची किंमत 3.70 लाख रुपये आहे. याचाच अर्थ, गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात स्वस्त कार असलेली ऑल्टो आता एस-प्रेसोपेक्षा महाग झाली आहे.
किमतीतील कपात खालीलप्रमाणे आहे:
- एस-प्रेसो (STD): जुनी किंमत 4.27 लाख रुपये, नवीन किंमत 3.50 लाख रुपये, कपात 77,000 रुपये.
- ऑल्टो K10 (STD): जुनी किंमत 4.23 लाख रुपये, नवीन किंमत 3.70 लाख रुपये, कपात 53,000 रुपये.
- एस-प्रेसो (LXI): जुनी किंमत 5.00 लाख रुपये, नवीन किंमत 3.80 लाख रुपये, कपात 1,20,000 रुपये.
- ऑल्टो K10 (LXI): जुनी किंमत 5.00 लाख रुपये, नवीन किंमत 4.00 लाख रुपये, कपात 1,00,000 रुपये.
जीएसटी 2.0 मुळे छोट्या पेट्रोल कारवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे, तसेच अनेक प्रकारचे सेस हटवण्यात आले आहेत. या बदलामुळेच कारच्या किमतीत एवढी मोठी घट झाली आहे.
सर्वात स्वस्त कार असण्यासोबतच, मारुती एस-प्रेसो आता भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही-स्टाइल कार देखील बनली आहे, जी दुचाकीवरून कारकडे अपग्रेड होणाऱ्या ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.
हे देखील वाचा – पोलिसांनी अडवली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गाडी, मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना लावला फोन; व्हिडिओ व्हायरल