Home / लेख / मारुती सुझुकीची सर्वात सुरक्षित SUV भारतात लाँच; 5-स्टार सेफ्टी रेटिंग-ADAS फीचर्ससह देणार क्रेटाला टक्कर

मारुती सुझुकीची सर्वात सुरक्षित SUV भारतात लाँच; 5-स्टार सेफ्टी रेटिंग-ADAS फीचर्ससह देणार क्रेटाला टक्कर

Maruti Suzuki Victoria

Maruti Suzuki Victoris: भारतीय बाजारात SUV सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी मारुती सुझुकीने आपली नवीन ‘व्हिक्टोरिस’ (Maruti Suzuki Victoris) SUV लाँच केली आहे. ‘Got It All’ या टॅगलाइनसह आलेली ही गाडी थेट ह्युंदाई क्रेटासारख्या (Hyundai Creta) मिड-साईज SUV ला स्पर्धा देईल.

मारुती सुझुकी लवकरच या SUV साठी बुकिंग सुरू करणार असून, लवकरच गाडीच्या किंमतीची घोषणा केली जाईल.

Maruti Suzuki Victoris: सुरक्षिततेमध्ये 5-स्टार रेटिंग आणि ADAS

सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह असलेल्या मारुतीने या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. नवीन व्हिक्टोरिस SUV ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. ही गाडी 6 एअरबॅग्ससह मानक म्हणून येते.

विशेष म्हणजे, मारुतीने प्रथमच भारतीय बाजारात लेव्हल-2 ADAS (ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) दिले आहे. यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, ऍडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, हाय बीम असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

तसेच, यात चारही चाकांना डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत.

Maruti Suzuki Victoris: डिझाइन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

व्हिक्टोरिसचे डिझाइन ई-विटारापासून (e-Vitara) प्रेरित आहे. गाडीची लांबी 4,360 mm, रुंदी 1,655 mm आणि उंची 1,795 mm आहे. यात 17-इंच एअरो-कट अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड LED टेल लॅम्प्स आहेत. ही गाडी 10 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात मिस्टिक ग्रीन आणि एटर्नल ब्लू या दोन नव्या रंगांचा समावेश आहे.

इंजिन आणि मायलेज: व्हिक्टोरिसमध्ये ग्रँड विटाराप्रमाणे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन (103 Hp) आणि 1.5 लिटरचे स्ट्रॉंग-हायब्रीड इंजिन (92.5 Hp) पर्याय मिळतात. CNG किटचाही पर्याय आहे. पेट्रोल इंजिन MT सह 21.18 kmpl तर AT सह 21.06 kmpl मायलेज देते. CNG व्हेरियंटचे मायलेज 27.02 km/kg असून, हायब्रीड व्हेरियंट 28.65 kmpl इतके दमदार मायलेज देते.

गाडीच्या आत 3-लेअर डॅशबोर्ड, ड्युअल टोन इंटीरियर आणि टेक्सचर्ड सीट अपहोल्स्ट्री आहे. CNG सिलिंडर फ्लोअरच्या खाली असल्यामुळे अधिक बूट स्पेस मिळते.

यात 10.1 इंचाची टचस्क्रीन, 8-स्पीकर इन्फिनिटी साऊंड सिस्टीम आणि मारुतीच्या कोणत्याही गाडीत प्रथमच 10.25 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यात 64 रंगांची ॲम्बिएंट लायटिंग, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर आणि 360-डिग्री कॅमेरासारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

इरफान पठाण, धोनी आणि ‘हुक्का’ वाद; नक्की काय घडले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल

राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार