Home / लेख / Windows 11 Bug: मायक्रोसॉफ्ट युजर्स त्रस्त! नवीन अपडेटमुळे कॉम्प्युटर बंद होणे झाले कठीण

Windows 11 Bug: मायक्रोसॉफ्ट युजर्स त्रस्त! नवीन अपडेटमुळे कॉम्प्युटर बंद होणे झाले कठीण

Microsoft Windows 11 Security Update Bug : मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सला गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे. जानेवारी...

By: Team Navakal
Windows 11 Bug
Social + WhatsApp CTA

Microsoft Windows 11 Security Update Bug : मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सला गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे. जानेवारी 2026 मध्ये कंपनीने जारी केलेल्या सिक्युरिटी पॅचमुळे कॉम्प्युटर सिस्टिममध्ये अनेक गंभीर ‘बग्स’ निर्माण झाले होते.

या तक्रारींची दखल घेत मायक्रोसॉफ्टने आता या समस्या सोडवण्यासाठी तातडीने ‘इमर्जन्सी अपडेट’ प्रसिद्ध केले आहे.

नेमक्या समस्या काय होत्या?

विंडोजच्या नवीन अपडेटनंतर प्रामुख्याने तीन मोठ्या त्रुटी समोर आल्या होत्या:

  1. शटडाऊनची समस्या: विंडोज 11 23H2 व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना आपला कॉम्प्युटर बंद करताना अडचणी येत होत्या. पीसी शटडाऊन किंवा हायबरनेट करण्याऐवजी तो आपोआप रीस्टार्ट होत होता. मायक्रोसॉफ्टने आता ही त्रुटी दूर केली आहे.
  2. रिमोट डेस्कटॉप फेल्युअर: विंडोज 11 24H2 आणि 25H2 व्हर्जनवर रिमोट डेस्कटॉप कनेक्शनद्वारे लॉगिन करताना अनेक युजर्सना अपयश येत होते. ही एक गंभीर समस्या मानली जात होती, ज्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे.
  3. आउटलुक क्रॅश: ज्या युजर्सचे आऊटलुकमध्ये ‘POP’ अकाउंट आहे, त्यांचे आऊटलुक क्लासिक वारंवार क्रॅश होत आहे. विशेष म्हणजे, ही समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही.

आणखी काही ‘अनपॅच’ समस्या

मायक्रोसॉफ्टने वरील दोन समस्या मान्य केल्या असल्या तरी, काही युजर्सना अजूनही वेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की, कॉम्प्युटर सुरू करताना काही मिनिटे फक्त ‘ब्लॅक स्क्रीन’ दिसते आणि त्यानंतर कर्सर येतो. तसेच, डेस्कटॉपचा वॉलपेपर आपोआप बदलून काळा (Black) होत असल्याचेही समोर आले आहे. या समस्यांबाबत कंपनीने अजून अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

युजर्सनी काय करावे?

जर तुमच्या विंडोज कॉम्प्युटरमध्ये शटडाऊन किंवा रिमोट लॉगिनच्या समस्या येत असतील, तर तातडीने विंडोज सेटिंगमध्ये जाऊन नवीन उपलब्ध असलेले अपडेट इन्स्टॉल करावे. आऊटलुकच्या समस्येवर कंपनी अजून काम करत असून, लवकरच त्यासाठी नवीन पॅच येण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या