Home / लेख / किंमत फक्त 15 हजार रुपयांपासून! लाँच झाला Moto चा शानदार 5G स्मार्टफोन; मिळेल 7000mAh बॅटरी

किंमत फक्त 15 हजार रुपयांपासून! लाँच झाला Moto चा शानदार 5G स्मार्टफोन; मिळेल 7000mAh बॅटरी

Moto G67 Power 5G Details : Moto G सिरीजचा नवा आणि शानदार स्मार्टफोन Moto G67 Power 5G भारतात लॉन्च झाला...

By: Team Navakal
Moto G67 Power 5G Details
Social + WhatsApp CTA

Moto G67 Power 5G Details : Moto G सिरीजचा नवा आणि शानदार स्मार्टफोन Moto G67 Power 5G भारतात लॉन्च झाला आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह आलेला हा लेटेस्ट फोन ग्राहकांना सुरुवातीच्या 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे, याला 7000mAh क्षमतेची प्रचंड बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ पॉवर टिकवून ठेवते.

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह येतो. ग्राहक हा नवीन हँडसेट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

किंमत आणि उपलब्ध ऑफर्स

Moto G67 Power 5G ची भारतीय बाजारात सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. ही किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. कंपनीने 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटच्या किमतीचा खुलासा अद्याप केलेला नाही.

  • लॉन्च ऑफर: लॉन्च ऑफर म्हणून SBI आणि Axis कार्ड्सवर 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
  • सवलतीनंतरची किंमत: डिस्काउंट मिळाल्यानंतर Moto G67 Power ची सुरुवातीची किंमत केवळ 14,999 रुपये होते.
  • हा डिवाइस तीन Pantone कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, तसेच यावर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

Moto G67 Power 5G चे खास स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट मिळतो आणि तो Android 15 वर आधारित Hello UX सह येतो. कंपनी या फोनला एक ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड आणि तीन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट देणार आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: डिवाइसला पॉवर देण्यासाठी 7000mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 30W चार्जिंगला सपोर्ट करते.

डिस्प्ले: यात 6.7-inch चा Full HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass 7i देण्यात आले आहे.

प्रोसेसर: फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे.

कॅमेरा: यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50MP चा मुख्य लेन्स आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 32MP चा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा – Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा; काय करतो जावई?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या