Home / लेख / Motorola Edge 50 Pro वर सर्वात मोठा डिस्काउंट! हजारो रुपयांची होईल बचत; फीचर्स खूपच अफलातून

Motorola Edge 50 Pro वर सर्वात मोठा डिस्काउंट! हजारो रुपयांची होईल बचत; फीचर्स खूपच अफलातून

Motorola Edge 50 Pro : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या...

By: Team Navakal
Motorola Edge 50 Pro
Social + WhatsApp CTA

Motorola Edge 50 Pro : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन Motorola Edge 50 Pro या स्मार्टफोनवर आकर्षक सवलत देत आहे. 35,999 रुपयांना लॉन्च झालेला हा फोन आता थेट 12,329 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्याने या फोनमध्ये रस असलेल्या ग्राहकांनी त्वरित खरेदी करणे योग्य ठरू शकते.

Motorola Edge 50 Pro ची सवलत आणि किंमत

12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या Motorola Edge 50 Pro (मूनलाइट पर्ल व्हेरिएंट) ची किंमत लॉन्चच्या वेळी 35,999 रुपये होती. सध्या अमेझॉनवर हा फोन केवळ 23,670 रुपयांना मिळत आहे.

या थेट सवलतीव्यतिरिक्त ग्राहक विविध बँक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच, आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 22,250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत करण्याची संधीही उपलब्ध आहे.

Motorola Edge 50 Pro ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • जबरदस्त डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा 1.5K pOLED कर्व्ह्ड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट (R, HDR10+ सपोर्ट आणि 2,000 निट्स पीक ब्राइटनेससह शानदार अनुभव देतो.
  • प्रोसेसर आणि पॉवर: Motorola Edge 50 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 हा शक्तिशाली प्रोसेसर वापरला आहे. याला 12GB RAM आणि 256GB स्टोरेजची जोड मिळाली आहे.
  • अल्ट्रा फास्ट चार्जिंग: यात 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 125W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फोन अगदी कमी वेळात पूर्ण चार्ज होतो.
  • उत्कृष्ट कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा (OIS सह), 13MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूमसह) यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

हे देखील वाचा – Digital Gold : 10 रुपयांत ‘डिजीटल गोल्ड’ खरेदी करताय? गुंतवणूकदारांना सेबीचा महत्त्वाचा इशारा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या