Motorola Edge 60 | मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 चिपसेट, 1.5K pOLED क्वाड-कर्व्ड डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेराआणि 5,500mAh बॅटरी (battery) यांसारखी दमदार वैशिष्ट्ये आहेत.
स्टँडर्ड Edge 60 मॉडेलसोबतच कंपनीने Edge 60 Fusion हँडसेटचा मायकोनोस ब्लू (Mykonos Blue) व्हेरिएंट देखील सादर केला आहे. नवीन Motorola Edge 60 ची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
Motorola Edge 60 ची किंमत आणि उपलब्धता:
Motorola Edge 60 च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटसाठीची किंमत 25,999 रुपये आहे. हा फोन 17 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया ई-स्टोअर आणि रिलायन्स डिजिटलसारख्या ठराविक ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.
सुरुवातीच्या ऑफरमध्ये ग्राहकांना Motorola Edge 60 ला 24,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल. हा हँडसेट सध्या Pantone Gibraltar Sea आणि Pantone Shamrock या आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Motorola Edge 60 चे फीचर्स
Motorola Edge 60 मध्ये 6.67-इंचाचा 1.5K (1,220×2,712 पिक्सेल) pOLED क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, टच सॅम्पलिंग रेट 300Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस लेव्हल 4,500 निट्सपर्यंत आहे. यात 20:09 आस्पेक्ट रेशो, 96.32 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट कव्हरेज मिळते.
तसेच, स्मार्ट वॉटर टच 3.0 तंत्रज्ञान, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आणि SGS लो ब्लू लाइट ) व मोशन ब्लर रिडक्शनसर्टिफिकेशन देखील आहे.
हा फोन ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7400 चिपसेटसह येतो, ज्याला 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS2.2 ऑनबोर्ड स्टोरेजची जोड आहे. स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते, तर RAM व्हर्च्युअल पद्धतीने अतिरिक्त 12GB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो.
फोटोग्राफीसाठी Motorola Edge 60 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. यात f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) असलेला 50-मेगापिक्सलचा Sony LYTIA 700C प्रायमरी सेन्सर आहे. याशिवाय, मॅक्रो क्षमतेसह f/2.0 अपर्चर असलेला दुसरा 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड-अँगल लेन्स सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमसह f/2.0 अपर्चर असलेला 10-मेगापिक्सलचा टेलिफोटो शूटर मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात f/2.0 अपर्चर असलेला 50-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग सेन्सर आहे.
फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 68W TurboPower चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात डॉल्बी ॲटमॉस (Dolby Atmos) सपोर्ट असलेले ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.