Motorola Razr 60: मोटोरोलाने (Motorola) भारतात आपला नवा Motorola Razr 60 हा स्वारोव्स्की (Swarovski) क्रिस्टलने सजवलेला शानदार फोन लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने स्वारोव्स्की क्रिस्टल असलेले Moto Buds Loop देखील सादर केले आहेत.
दोन्ही डिव्हाइस पॅन्टोन आइस मेल्ट कलरमध्ये लाँच झाले आहेत. या फोल्डेबल फोनला लेदर-इन्स्पायर्ड फिनिशसह 35 स्वारोव्स्की क्रिस्टलचा 3डी क्विल्टेड पॅटर्न देण्यात आला आहे. फोनच्या हिंजवर 24-फेसेट क्रिस्टल आहे, तर वॉल्यूम बटनलाही क्रिस्टलचा लूक देण्यात आला आहे.
8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 54,999 रुपये आहे. त्याची विक्री 11 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट, कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू होईल.
Motorola Razr 60 स्वारोव्स्की क्रिस्टल एडिशनचे फीचर्स
- डिस्प्ले: यात 6.96 इंचाचा pOLED इनर डिस्प्ले असून, तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यात गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन दिले आहे. याचा पीक ब्राईटनेस 3000 निट्स इतका आहे. तसेच, यात 3.63 इंचाचा pOLED कव्हर डिस्प्ले असून, तो 90Hz रिफ्रेश रेट आणि 1700 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर आणि स्टोरेज: यात मीडियाटेक डायमेंसिटी 7400x चिपसेट असून, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.
- कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य लेन्स आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी: यात 4500mAh ची बॅटरी असून, ती 45W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto Buds Loop स्वारोव्स्की क्रिस्टल एडिशनचे फीचर्स
फोनसोबतच कंपनीने Moto Buds Loop चे स्वारोव्स्की क्रिस्टल एडिशनही लाँच केले आहे. हे बड्स सिल्व्हर आणि गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
- ऑडिओ: दमदार आवाजासाठी यात बोसची ऑडिओ टेक्नॉलॉजी वापरली आहे. हे ओपन-इअर डिझाइन आणि स्पॅशियल ऑडिओसह येतात. यात 12mm च्या आयर्नलेस ड्राइव्हर्ससह ड्युअल माइक सिस्टीम आणि उत्कृष्ट कॉलिंगसाठी CrystalTalk AI देण्यात आले आहे.
- बॅटरी: सिंगल चार्जवर 8 तासांपर्यंत प्लेबॅक देतात, तर चार्जिंग केससह 39 तासांपर्यंत वापरता येतात. केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 3 तासांचा प्लेटाइम मिळतो.
किंमत आणि उपलब्धता: या बड्सची किंमत 24,999 रुपये असून, त्यांची विक्री 11 सप्टेंबरपासून सुरू होईल. हे फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असतील.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला मणिपूरला भेट देण्याची शक्यता’; हिंसाचारानंतर पहिला संभाव्य दौरा
कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय