Nissan ने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite चे CNG मॉडेलभारतात लॉन्च केले आहे. याची किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 10.02 लाखा रुपयांपर्यंत जाते. 1 जूनपासून दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटक या 7 राज्यांमध्ये अधिकृत Nissan डीलरशिपवर कारची बुकिंग सुरू होईल.
Nissan ने माहिती दिली आहे की Magnite चे फेसलिफ्ट मॉडेल रिट्रोफिट CNG किटसाठी सुसंगत असले तरी, त्यांनी अजून प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर याची चाचणी केलेली नाही.
Nissan Magnite CNG मॉडेल 6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. सोबतच, Motozen द्वारे रिट्रोफिट CNG किट दिली जाईल. याचे सरकारी मान्यताप्राप्त फिटमेंट केंद्रांवर इंस्टॉलेशन करून मिळेल. CNG किट डीलर स्तरावर 75,000 रुपये अतिरिक्त किमतीत उपलब्ध असेल.
NISSAN MAGNITE पेट्रोल आणि CNG मॉडेलची किंमत
मॉडेल | पेट्रोल मॉडेल किंमत (लाख रुपये) | CNG मॉडेल किंमत (लाख रुपये) |
---|---|---|
Visia | 6.14 | 6.89 |
Visia+ | 6.64 | 7.39 |
Acenta | 7.29 | 8.04 |
N-Connecta | 7.97 | 8.72 |
Tekna | 8.92 | 9.67 |
Tekna+ | 9.27 | 10.02 |
Nissan Magnite साठी 1.0-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत सिंगल-सिलेंडर CNG किट देत आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सस्टँडर्ड आहे. 1.0-लिटर NA इंजिनसह Magnite 6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असल्याने, CNG किट देखील त्याच 6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, परंतु त्याची किंमत 75,000 रुपये जास्त आहे. नवीन Magnite मध्ये 20 हून अधिक फर्स्ट-इन-सेगमेंट आणि बेस्ट-इन-सेगमेंट फीचर्स तसेच 55 हून अधिक सुरक्षा फीचर्स आहेत.
CNG किट Motozen द्वारे पुरवले जाईल आणि सरकारी मान्यताप्राप्त फिटमेंट केंद्रांवर त्याचे इंस्टॉलेशन केले जाईल. CNG फिटमेंटवर 3 वर्षांची/1 लाख किमीची वॉरंटी मिळेल.