Home / लेख / महिन्याला फक्त 10,768 रुपये देऊन घरी घेऊन जा Nissan ची लोकप्रिय कार;  जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

महिन्याला फक्त 10,768 रुपये देऊन घरी घेऊन जा Nissan ची लोकप्रिय कार;  जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

Nissan Magnite Price

Nissan Magnite Price: भारतीय बाजारपेठेत, एसयूव्ही सेगमेंटमध्ये Nissan Magnite Facelift ही लोकप्रिय गाडी आहे. कंपनीने या गाडीचा CNG व्हेरियंट म्हणून Visia CNG बाजारात आणले आहे.

तुम्ही फक्त एक लाख रुपये डाउनपेमेंट करून ही गाडी घरी घेऊन शकता. या गाडीची किंमत किती आहे व खरेदी करताना महिन्याला किती EMI भरावा लागेल, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Nissan Magnite ची किंमत किती आहे?

Nissan Magnite Facelift च्या CNG Visia व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे. ही गाडी दिल्लीत खरेदी केल्यास, सुमारे 48 हजार रुपये रोड टॅक्स आणि सुमारे 32 हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागेल. या खर्चानंतर Nissan Magnite Visia CNG ची ऑन-रोड किंमत अंदाजे 7.69 लाख रुपये होते.

1 लाख रुपये डाउनपेमेंट केल्यावर EMI किती?

जर तुम्ही या गाडीचा बेस व्हेरियंट Visia विकत घेत असाल, तर बँक एक्स-शोरूम किमतीवर कर्ज देईल. अशा परिस्थितीत, एक लाख रुपये डाउनपेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 6.69 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला नऊ टक्के व्याजाने सात वर्षांसाठी 6.69 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 10,768 रुपये EMI भरावा लागेल.

भारतीय बाजारपेठेत Nissan Magnite Facelift चा थेट मुकाबला Compact SUV सेगमेंटमधील Maruti Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Kia Syros या गाड्यांशी आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती

गणेशोत्सवाचा इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा कशी बनली महाराष्ट्राचा अभिमान? जाणून घ्या

Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा