Home / लेख / Nucleus Genomics: AI आधारित स्टार्टअपची धक्कादायक संकल्पना! पसंतीच्या वैशिष्ट्यांनुसार ‘उत्तम बाळ’ निवडण्याची सेवा सुरु

Nucleus Genomics: AI आधारित स्टार्टअपची धक्कादायक संकल्पना! पसंतीच्या वैशिष्ट्यांनुसार ‘उत्तम बाळ’ निवडण्याची सेवा सुरु

Nucleus Genomics: आपले बाळ सुंदर, सुदृढ व बुद्धिमान असावे असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र, आता चक्क तंत्रज्ञानाच्या मदतीने हवे ती...

By: Team Navakal
Nucleus Genomics
Social + WhatsApp CTA

Nucleus Genomics: आपले बाळ सुंदर, सुदृढ व बुद्धिमान असावे असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र, आता चक्क तंत्रज्ञानाच्या मदतीने हवे ती वैशिष्ट्ये असलेले बाळ जन्माला घालणे शक्य होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आता मानवी जीवनाच्या मूलभूत स्तरावर बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.

एका नवीन startup ने फर्टिलिटी क्षेत्रात प्रवेश करत एक वादग्रस्त सेवा सुरू केली आहे, जी पालकांना त्यांच्या पसंतीच्या शारीरिक वैशिष्ट्यांनुसार, बुद्ध्यांकानुसार (IQ) किंवा भविष्यातील आजारांच्या धोक्यांनुसार बाळाची निवड करण्याची शक्यता देते.

Nucleus Genomics नावाच्या न्यूयॉर्क-स्थित या कंपनीने आपल्या वेबसाइटवर थेट घोषणा केली आहे: “तुमचे सर्वात उत्कृष्ट बाळ मिळवा. बाळाला घरी आणण्याचा हा नवीन मार्ग आहे.” 2021 मध्ये Kian Sadeghi या उद्योजकाने सुरू केलेली ही कंपनी आता जनुकीय क्रमांकन (Genome Sequencing) आणि प्रतिबंधात्मक आरोग्याद्वारे बाळाच्या जनुकीय गुणांचा अंदाज घेण्याची सेवा देत आहे. Kian Sadeghi यांनी 32 दशलक्ष USD ची गुंतवणूक या कंपनीसाठी जमा केली आहे आणि गोपनीयता हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

आवड निवड नुसार एम्ब्रियो निवड

या कंपनीने आपल्या वेबसाइटवर एम्ब्रियो टेस्टिंगचा अनुभव एका ऑनलाइन क्विझसारखा बनवला आहे. यात पालकांना त्यांच्या पसंतीचे 2,000 हून अधिक संयोजन निवडण्याचा पर्याय मिळतो.

डोळ्याचा रंग, उंचीची विशिष्ट श्रेणी आणि सामान्य बुद्ध्यांक (IQ) यांसारखी वैशिष्ट्ये निवडण्याचा पर्याय मिळतो. तसेच, स्तनाचा कर्करोग किंवा मधुमेह यांसारख्या गंभीर रोगांचा धोका असलेल्या जनुकीय गुणांबद्दलची चिंतेची पातळीही निवडता येते.

नैतिक प्रश्न आणि कंपनीचा बचाव

या सेवेमुळे नैतिक वादळ निर्माण झाले आहे. Nucleus Genomics चा दावा आहे की, रोगांचे अनुमान अचूकपणे करणे आणि दीर्घकाळ आरोग्य सुनिश्चित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनी स्पष्ट करते की, “जनुकीय माहिती केवळ एम्ब्रियो निवडीसाठी मदतगार ठरू शकते, ती हमी देत नाही.”

रोगांचा धोका कमी करण्याची इच्छा लवकरच ‘श्रेष्ठत्व’ निर्माण करण्याच्या इच्छेमध्ये बदलेल, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. काही मुले त्यांच्या जनुकीय गुणांमुळे इतरांपेक्षा ‘उत्तम’ आहेत, ही कल्पना अशा कंपन्यांमुळे सामान्य होण्याची भीती आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या