Home / लेख / OnePlus च्या प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 21 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट; ऑफर-फीचर्स एकदा पाहाच

OnePlus च्या प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 21 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट; ऑफर-फीचर्स एकदा पाहाच

OnePlus 12 Discount: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. वनप्लसचा शक्तिशाली फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला OnePlus 12 आता...

By: Team Navakal
OnePlus 12
Social + WhatsApp CTA

OnePlus 12 Discount: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. वनप्लसचा शक्तिशाली फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला OnePlus 12 आता फ्लिपकार्टवर विक्रमी सवलतीसह उपलब्ध झाला आहे. जानेवारी २०२४ मध्ये ६४,९९९ रुपयांना लाँच झालेला हा फोन आता अतिशय कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

OnePlus 12 ची प्रमुख वैशिष्ट्ये

हा स्मार्टफोन आपल्या तगड्या फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे:

  1. डिस्प्ले: ६.८२ इंचाची एमोलेड डिस्प्ले, ज्याचे रेझोल्यूशन १४४०x३१६८ पिक्सल असून १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो.
  2. प्रोसेसर: अतिशय वेगवान कामगिरीसाठी यात स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ हे प्रोसेसर देण्यात आले आहे.
  3. बॅटरी: ५,४०० एमएएचची मोठी बॅटरी आणि १०० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट याला तासनतास सुरू ठेवण्यास मदत करतो.
  4. कॅमेरा सेटअप: मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ६४ मेगापिक्सलचा दुसरा आणि ४८ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  5. इतर फिचर्स: फोनला आयपी६५ रेटिंग मिळाली असून तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. तसेच ५जी, वाय-फाय ७, ब्ल्यूटूथ ५.४ आणि एनएफसीसारख्या सर्व आधुनिक कनेक्टिव्हिटी सुविधा यात आहेत.

फोनचे वजन २२० ग्राम असून तो दिसायला अत्यंत स्टायलिश आहे. जर तुम्ही बजेटच्या कारणामुळे हा फोन घेण्याचे टाळत असाल, तर आता ही डील हातची घालवू नका.

किंमत आणि धमाकेदार ऑफर्स

फ्लिपकार्टवर सध्या OnePlus 12 चा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट ४७,३१२ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले, तर तुम्हाला ३,५५४ रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

या सर्व सवलतींनंतर, तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ ४३,७५८ रुपयांत मिळू शकेल. म्हणजेच, मूळ किमतीपेक्षा हा फोन सुमारे २१,२४१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. याशिवाय, जुना फोन देऊन तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या