OnePlus 13 Offer: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. वनप्लसचा शक्तिशाली फ्लॅगशिप फोन OnePlus 13 सध्या अॅमेझॉनवर भारी डिस्काउंटसह उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत ६९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन आता ६०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत आपलासा करता येईल. शानदार डिझाइन, दमदार बॅटरी आणि हॅसलब्लेड कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अॅमेझॉनवरील धमाकेदार ऑफर
अॅमेझॉनवर सध्या OnePlus 13 चे १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असलेले व्हेरिएंट ६०,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे. म्हणजेच लाँच किमतीच्या तुलनेत थेट ९,००० रुपयांची कपात करण्यात आली आहे.
एवढेच नाही, तर ठराविक बँकांच्या कार्डचा वापर केल्यास ३,००० रुपयांची अतिरिक्त ‘बँक ऑफर’ देखील मिळत आहे. यामुळे या फोनची प्रभावी किंमत साधारणपणे ५७,००० रुपयांपर्यंत खाली येते. जर तुम्हाला अधिक बचत करायची असेल, तर जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही चांगली व्हॅल्यू मिळवू शकता. तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीनुसार अॅमेझॉनवर एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. ग्राहकांसाठी २,१४५ रुपयांपासून सुरू होणारे सुलभ ईएमआय (EMI) पर्यायही उपलब्ध आहेत.
का खरेदी करावा OnePlus 13?
५७,००० रुपयांच्या रेंजमध्ये हा फोन एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरत आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- परफॉर्मन्स: यामध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट देण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी अत्यंत वेगवान आहे.
- डिस्प्ले: फोनमध्ये २के एलटीपीओ अॅमोलेड पॅनल असून व्हिज्युअल्स अत्यंत स्पष्ट दिसतात.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यामध्ये हॅसलब्लेड सपोर्ट असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो.
- बॅटरी: ६,००० एमएएचची मोठी बॅटरी दीर्घकाळ साथ देते.
विशेष म्हणजे, कंपनी ग्रीन लाईनच्या समस्येसाठी लाइफटाइम वॉरंटी देखील देत आहे. सुरक्षिततेसाठी ग्राहक अतिरिक्त पैसे देऊन एक्सटेंडेड वॉरंटी किंवा टोटल मोबाईल प्रोटेक्शनसारखे पर्यायही निवडू शकतात. जर तुम्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा फोन शोधत असाल, तर ही डील नक्कीच फायदेशीर आहे.











