OnePlus Nord 6 price in India launch : प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी वनप्लसने भारतात आपला बहुप्रतिक्षित OnePlus Nord 6 अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन प्रामुख्याने त्याच्या अवाढव्य बॅटरी बॅकअपसाठी आणि वेगवान कामगिरीसाठी ओळखला जाणार आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि टिकाऊपणाचा विचार करून हा फोन तयार करण्यात आला आहे.
किंमत आणि सेलची तारीख
वनप्लसने हा फोन दोन वेगवेगळ्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला आहे:
- 8GB+256GB: 38,999 रुपये.
- 12GB+256GB: 41,999 रुपये.
हा स्मार्टफोन फ्रेश मिंट, पिच ब्लॅक आणि क्विक सिल्वर अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. 9 एप्रिलपासून अॅमेझॉन आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाईटवर याची विक्री सुरू होईल.
बँक ऑफर्स: अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेच्या ईएमआय व्यवहारांवर 3,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
OnePlus Nord 6 चे दमदार फीचर्स
- डिस्प्ले: यात 6.78 इंचाचा 1.5K अॅमोलेड डिस्प्ले असून त्याला 165Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसण्यासाठी यात 3600 निट्सची ब्राइटनेस आहे.
- प्रोसेसर: वेगासाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 4 ही नवीन चिपसेट वापरली आहे. गेमिंगसाठी यात खास कूलिंग सिस्टिमही दिली आहे.
- बॅटरी: या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची 9,000mAh ची अवाढव्य बॅटरी. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे यात रिव्हर्स चार्जिंगची सोयही आहे.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मागे 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- टिकाऊपणा: हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्यासाठी IP66, IP68 आणि IP69 सारख्या उच्च रेटिंगसह येतो. तसेच याला मिलिटरी-ग्रेड मजबूती देण्यात आली आहे.
- सॉफ्टवेअर: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित असून कंपनीने 4 मोठ्या अँड्रॉइड अपडेट्स आणि 6 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, वाय-फाय आणि ब्लूटूथ 6 यांसारखे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.











