PDCC Bank Recruitment : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने लिपिक (Clerk) पदासाठी एकूण 434 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवार 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतील.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
- शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षांदरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना 70% जागा राखीव
एकूण रिक्त जागांपैकी 70% जागा पुणे जिल्ह्याचे कायम रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित 30% जागा पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या आहेत. अर्जदारांनी त्यांच्या मूळ अधिवास प्रमाणपत्राची (Domicile Certificate) प्रत ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र अपलोड न केल्यास अर्ज अपूर्ण मानला जाईल.
निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांद्वारे गुणवत्ता यादीनुसार केली जाईल:
- ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Test)
- मुलाखत (Interview)
ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
| महत्वाच्या तारखा | |
| अर्ज करण्याची सुरुवात | 1 डिसेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 डिसेंबर 2025 (11:59 PM) |
| ऑनलाइन परीक्षेची फी भरण्याची अंतिम तारीख | 20 डिसेंबर 2025 |
| परीक्षा फी | लवकरच जाहीर केली जाईल |
| नोकरी ठिकाण | पुणे |
अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जामध्ये अचूक ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व अद्यतने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.pdcc.bank.in/) नियमितपणे तपासण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
हे देखील वाचा – Flipkart ची खास ऑफर! Oppo च्या फोनवर बंपर डिस्काउंट; मिळेल 7000mAh बॅटरी आणि 32MP कॅमेरा









