Poco X8 Pro series price in India : स्मार्टफोन मार्केटमध्ये आपल्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या पोको कंपनीने भारतात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोकोने आपली बहुप्रतीक्षित ‘X8 प्रो’ सिरीज अधिकृतपणे लाँच केली असून, यामध्ये परफॉर्मन्स, गेमिंग आणि विशेषतः बॅटरीवर मोठा भर देण्यात आला आहे.
या सिरीजमध्ये Poco X8 Pro Max, Poco X8 Pro आणि चाहत्यांसाठी खास Poco X8 Pro Iron Man Edition असे तीन दमदार मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत.
Poco X8 Pro series : बॅटरी आणि चार्जिंगचा नवा विक्रम
या सिरीजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची बॅटरी क्षमता. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये चक्क 9000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर कित्येक दिवस टिकू शकते. सोबतच 100W चे हायपरचार्ज सपोर्ट आणि इतर उपकरणांना चार्ज करण्यासाठी 27W रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही यात मिळते.
Poco X8 Pro series : पाहा किमती आणि लाँच ऑफर्स
हा स्मार्टफोन २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. बँकेच्या आणि एक्स्चेंज ऑफर्सनंतर या गाड्यांच्या किमती खालीलप्रमाणे असतील:
| मॉडेल | व्हेरिएंट | प्रभावी किंमत (रुपये) |
| Poco X8 Pro | 8GB + 256GB | 29,999 |
| Poco X8 Pro | 12GB + 256GB | 32,999 |
| Iron Man Edition | 12GB + 256GB | 34,999 |
| Poco X8 Pro Max | 12GB + 256GB | 39,999 |
| Poco X8 Pro Max | 12GB + 512GB | 43,999 |
अतिरिक्त फायदे: २३ मार्च रोजी खरेदी केल्यास १ वर्षाची वाढीव वॉरंटी आणि १ वर्षासाठी स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन मिळेल. शिवाय यूट्यूब आणि स्पॉटिफाय प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.
Poco X8 Pro series : भन्नाट फीचर्स आणि गेमिंग परफॉर्मन्स
- डिस्प्ले: ६.८३ इंचाचा मोठा स्क्रीन असून यात ३,५०० निट्सची ब्राइटनेस आहे, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसतो.
- कॅमेरा: फोटोसाठी ५० मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- कुलिंग सिस्टीम: गेम खेळताना फोन गरम होऊ नये म्हणून यामध्ये प्रगत कुलिंग तंत्रज्ञान वापरले आहे.
- डिझाइन: लोखंडी फ्रेम आणि डायनॅमिक लाईटिंगसह हा फोन अतिशय प्रीमियम दिसतो. विशेष म्हणजे आयर्न मॅन एडिशनमध्ये आर्क रिॲक्टरसारखे फ्लॅश मॉडेल देण्यात आले आहे.
धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोन्सना IP69K पर्यंतचे रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे हे फोन्स अधिक टिकाऊ ठरतात. गेमिंग प्रेमींसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 9500s हा शक्तिशाली प्रोसेसर वापरला आहे, ज्याचा ‘अँटुडू स्कोअर’ ३० लाखांच्या पार जातो.
हे देखील वाचा – Best SUVs For Long Drive : लांबच्या ट्रिपसाठी ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम 5 SUV, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत










