Cancer Symptoms: टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा, अभिनेत्री प्रिया मराठेचे (Priya Marathe) कॅन्सरच्या दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी आणि मराठी मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिच्या अकाली एक्झिटमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या सहकलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रिया मराठे यांच्या निधनाने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कॅन्सर हा आज जगभरात एक मोठी आरोग्य समस्या बनलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष लोकांना या आजाराचे नव्याने निदान होते, तर 10 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
दुर्दैवाने, 2040 पर्यंत ही संख्या 30 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एकेकाळी फक्त वृद्धांना होणारा रोग मानला जाणारा कॅन्सर आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लवकर निदान.
कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे (Cancer Symptoms):
अनेकदा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सूक्ष्म आणि सहज दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. ‘मेयो क्लिनिक’ (Mayo Clinic) आणि ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’ (American Cancer Society) नुसार, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, शरीरावर गाठी किंवा सूज येणे, त्वचेवर बदल दिसणे किंवा आठवड्यांपर्यंत न जाणारा खोकला, ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत.
याशिवाय, बिनाकारण होणाऱ्या वेदना, आतड्यांच्या सवयींमध्ये बदल, गिळण्यास त्रास किंवा असामान्य रक्तस्त्राव ही चिन्हे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
नियमित तपासणीचे महत्त्व:
काही लोकांना कर्करोगाचा धोका जास्त असतो, जसे की ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे, किंवा जे धूम्रपान आणि दारूचे सेवन करतात. अशा व्यक्तींसाठी नियमित तपासणी अत्यंत गरजेची आहे.
‘मॅमोग्राम’ (स्तन कर्करोग), ‘पॅप स्मीअर’ (गर्भाशयाच्या कर्करोग) आणि ‘कोलोनोस्कोपी’ (कोलोरेक्टल कर्करोग) यांसारख्या तपासण्या लक्षणे दिसण्यापूर्वीच कर्करोगाचे निदान करू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटबाबत मसुदा अंतिम टप्प्यात! मंत्री विखे पाटलांची माहिती
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार?आरोपांना शशिकांत शिंदेंचे आव्हान