Home / लेख / Reliance Jio चा मोठा धमाका! 50 कोटी ग्राहकांना 1 महिन्यासाठी मोफत अनलिमिटेड डेटा; पाहा खास ऑफर

Reliance Jio चा मोठा धमाका! 50 कोटी ग्राहकांना 1 महिन्यासाठी मोफत अनलिमिटेड डेटा; पाहा खास ऑफर

Reliance Jio

Reliance Jio Offers: रिलायन्स जिओने 50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केल्याची घोषणा केली आहे. कंपनी आपला 9 वा वर्धापन दिन साजरा करत असून, यानिमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत.

या विशेष ऑफर्समध्ये मोबाईल ग्राहकांसाठी 349 रुपयांचा सेलिब्रेशन प्लॅन आणि JioHome ग्राहकांसाठी 1,200 रुपयांचा सेलिब्रेशन प्लॅन लाँच केला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

मोबाईल ग्राहकांसाठी 349 रुपयांचा सेलिब्रेशन प्लॅन

5 ते 7 सप्टेंबर दरम्यान, सर्व जिओ स्मार्टफोन ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेता येईल. ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहे, ते 39 रुपयांचा टॉप-अप पॅक घेऊन अनलिमिटेड 4G डेटाचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, संपूर्ण महिन्यासाठी 349 रुपयांच्या सेलिब्रेशन प्लॅनमध्ये खालील फायदे मिळतील:

  • अनलिमिटेड 5G डेटा
  • दररोज 2GB डेटा
  • जिओ फायनान्सद्वारे 2% अतिरिक्त डिजिटल गोल्ड

3,000 रुपये किमतीचे सेलिब्रेशन व्हाउचर:

  • 1 महिन्याचे JioHotstar सबस्क्रिप्शन
  • 1 महिन्याचे JioSaavn Pro सबस्क्रिप्शनसह अनलिमिटेड कॉलर ट्यून्स
  • 3 महिन्यांची Zomato Gold मेंबरशिप
  • 6 महिन्यांचे Netmeds First सबस्क्रिप्शन
  • रिलायन्स डिजिटलवर 100% रिचार्ज कॅशबॅक
  • AJIO वर फॅशन डील्स
  • EaseMyTrip वर प्रवासाची ऑफर्स
  • 2 महिन्यांची JioHome ची फ्री ट्रायल

JioHome ग्राहकांसाठी 1,200 रुपयांचा प्लॅन

  • JioHome ग्राहकांसाठी 1,200 रुपये (GST सह) मध्ये दोन महिन्यांचे कनेक्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये खालील फायदे मिळतील:
  • 1,000 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल्स
  • 30 Mbps अनलिमिटेड डेटा
  • JioHotstar सह 12 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा ॲक्सेस
  • Wi-Fi 6 राउटर आणि 4K स्मार्ट सेट-टॉप बॉक्स

याशिवाय, 2 महिन्यांचे Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन, Jio Finance द्वारे 2% अतिरिक्त डिजिटल गोल्ड आणि 3,000 रुपये किमतीचे सेलिब्रेशन व्हाउचर मिळतील.

कंपनीने या ऑफर्सद्वारे आपल्या वाढत्या ग्राहकवर्गाला विशेष फायदे देत डिजिटल आणि होम सेवांचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवला आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा धमाका! पदार्पणाच्या पहिल्या 5 सामन्यातच मोडला नवज्योत सिंग सिद्धूंचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड