Jio Happy New Year Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. कंपनीने ‘हॅपी न्यू ईअर’ नावाचा एक विशेष रिचार्ज प्लॅन सादर केला असून त्याची किंमत 500 रुपये आहे.
हा प्लॅन केवळ कॉलिंग किंवा डेटा पुरता मर्यादित नसून, यामध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे पाहून ग्राहक थक्क होत आहेत. विशेषतः तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची आवड असलेल्या लोकांसाठी हा प्लॅन एक उत्तम डील ठरत आहे.
डेटा आणि कॉलिंगचे फायदे
या 500 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो, म्हणजेच संपूर्ण महिनाभरात एकूण 56 GB डेटा वापरता येईल. दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 kbps होतो.
याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा यात समाविष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या भागात जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेता येईल.
मनोरंजनाचा खजिना: मोफत OTT सबस्क्रिप्शन
जिओच्या या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यासोबत मिळणारे ओटीटी प्लॅटफॉर्म्स. या एकाच रिचार्जमध्ये युजर्सना YouTube Premium, Amazon Prime Video (मोबाईल एडिशन), JioHotstar, Sony LIV, ZEE5 आणि Lionsgate Play यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सचा एक्सेस मिळतो.
याव्यतिरिक्त Discovery+, Sun NXT, Planet Marathi आणि Chaupal सारख्या प्रादेशिक प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे.
Google Gemini Pro आणि AI क्लाउड स्टोरेज
जिओने या प्लॅनमध्ये चक्क Google Gemini Pro चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत दिले आहे, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे 35,100 रुपये आहे. या सुविधेचा लाभ पुढेही सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना भविष्यात किमान 349 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करणे आवश्यक असेल. यासोबतच 50 GB फ्री जिओ एआय क्लाउड स्टोरेज, दोन महिन्यांचा जिओ होम फ्री ट्रायल आणि जिओ फायनान्सद्वारे सोनं खरेदीवर 1 टक्का अतिरिक्त फायदा असे अनेक प्रीमियम बेनिफिट्स या प्लॅनमध्ये मिळत आहेत.
हे देखील वाचा – Uric Acid: युरिक ॲसिड वाढल्यामुळे त्रस्त आहात? औषधांशिवाय घरगुती उपायांनी मिळवा कायमचा आराम









