Home / लेख / 7-सीटर कार स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी! जीएसटीमुळे 80 हजारांची बचत; पाहा डिटेल्स

7-सीटर कार स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी! जीएसटीमुळे 80 हजारांची बचत; पाहा डिटेल्स

Renault Triber New Price: देशातील सर्वात लोकप्रिय बजेट 7-सीटर MPV (मल्टिपर्पज व्हेईकल) पैकी एक असलेल्या रेनॉल्ट ट्राइबर (Renault Triber) च्या...

By: Team Navakal
Renault Triber New Price

Renault Triber New Price: देशातील सर्वात लोकप्रिय बजेट 7-सीटर MPV (मल्टिपर्पज व्हेईकल) पैकी एक असलेल्या रेनॉल्ट ट्राइबर (Renault Triber) च्या खरेदीदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर कंपनीने ट्राइबरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे ही गाडी तब्बल 80,195 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.

किंमत कपातीनंतर, ट्राइबर आता 5,76,300 रुपयांच्या (एक्स-शोरूम) प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे.

सर्वाधिक कपात टॉप-एंड मॉडेलवर

रेनोने जाहीर केलेल्या नवीन किमतींनुसार, ट्राइबरच्या सर्व व्हेरियंट्सवर कपात झाली आहे. यात सर्वाधिक 80,195 रुपयांची कपात Emotion AMT डुअल टोन (Emotion AMT Dual Tone) या टॉप-एंड व्हेरियंटवर झाली आहे. GST 2.0 मध्ये झालेल्या बदलांमुळे ट्राइबर आता 18% जीएसटी स्लॅबमध्ये आली आहे, ज्यामुळे ही किंमत कपात शक्य झाली आहे.

व्हेरियंटनुसार नवीन किमती आणि कपात

व्हेरियंटजुनी किंमत (INR)नवी किंमत (INR)कपात (INR)
Authentic6,29,9955,76,30053,695
Evolution7,24,9956,63,20061,795
Techno7,99,9957,31,80068,195
Emotion8,64,9957,91,20073,795
Emotion AMT9,16,9958,38,80078,195
Emotion MT DT8,87,9958,12,30075,695
Emotion AMT DT9,39,9958,59,80080,195

Renault Triber चे फीचर्स

Renault Triber गाडीच्या बाहेरील भागात स्मोक्ड टेल लॅम्प्स आणि डायमंड-शेप मध्ये असलेला नवीन रेनॉल्ट लोगो देण्यात आला आहे. अंतर्गत भागात अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (IC), अँबियंट लाइट्स, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल मिळते.

7-सीटर कॉन्फिगरेशन कायम असून, लांबच्या प्रवासासाठी ही एक चांगली कार आहे.

कंपनीने इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात 1.0-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज , ट्रॅफिक साइन रिकग्निशन कॅमेरा यांसारखी महत्त्वाची फीचर्स स्टँडर्ड म्हणून देण्यात आली आहेत.

हे देखील वाचा – ‘बाबरी मशीद बांधणे हेच ‘मूळ अपवित्रतेचे कृत्य’; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे मोठे विधान

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या