Royal Enfield Bikes: भारतीय रस्त्यांवर Royal Enfield ची क्रेझ नेहमीच राहिली आहे. मात्र, आताचे ग्राहक केवळ आवाजावर न जाता बाइकच्या इंधन बचतीचाही विचार करत आहेत. तुम्हीही ३५० सीसी सेगमेंटमध्ये स्टायलिश आणि खिशाला परवडणारी Enfield शोधत असाल, तर मायलेजच्या बाबतीत खालील पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Hunter 350
Royal Enfield च्या ताफ्यातील ही सर्वात स्वस्त आणि वजनाने हलकी बाइक मानली जाते. Hunter 350 चे क्लेम केलेले मायलेज 36.2 kmpl इतके आहे. या बाइकचे डिझाईन आधुनिक असून शहरातील ट्रॅफिकमध्ये ती चालवणे अत्यंत सोपे आहे. ज्यांना कमी किमतीत दणकट बाइक हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे.
Classic 350
मायलेजच्या बाबतीत Classic 350 या यादीत सर्वात आघाडीवर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाइक सुमारे 41 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. रेट्रो लूक आणि हायवेवर मिळणारा स्मूद अनुभव यामुळे ही बाइक सर्वाधिक विकली जाणारी मॉडेल ठरली आहे. स्टाईल आणि रनिंग कॉस्टचा विचार करणाऱ्यांसाठी ही पहिली पसंती आहे. याची सुरुवातीची किंमत 1.83 लाख रुपये आहे.
Bullet 350
पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर राज्य करणारी Bullet 350 आजही 36.2 kmpl चे समाधानकारक मायलेज देते. ज्यांना पारंपारिक लूक आणि अस्सल रॉयल फील हवा आहे, त्यांच्यासाठी ही बाइक आजही सर्वोत्तम आहे. शहरात किंवा छोट्या ट्रिप्ससाठी ही बाइक अतिशय उपयुक्त ठरते. याची किंमत 1.64 लाख रुपयांपासून सुरू होते.
Goan Classic 350
ज्यांना गर्दीपेक्षा वेगळे दिसायचे आहे, त्यांच्यासाठी Goan Classic 350 हा एक कस्टमाइज्ड पर्याय आहे. या बाइकचे मायलेज देखील 36.2 kmpl च्या आसपास आहे. व्हाईटवॉल टायर्स आणि आकर्षक रंगांमुळे ही बाइक रस्त्यावरून जाताना सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मॉडेलची किंमत 2.20 लाख रुपये इतकी आहे.
Meteor 350
क्रूझर बाइक प्रेमींसाठी Meteor 350 हा एक शानदार पर्याय आहे. या बाइकचे मायलेज 36.2 kmpl इतके असून ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक आहे. हायवेवरील स्थिरता आणि आधुनिक फीचर्स यामुळे ही बाइक प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1.96 लाख रुपयांपासून सुरू होते.












