Home / लेख / थेट Amazon-Flipkart वरून खरेदी करा Royal Enfield च्या बाईक्स ; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील ग्राहकांना मिळणार लाभ

थेट Amazon-Flipkart वरून खरेदी करा Royal Enfield च्या बाईक्स ; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील ग्राहकांना मिळणार लाभ

Royal Enfield Online Booking: रॉयल एनफील्डने (Royal Enfield) सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी आपली मोटारसायकल खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे....

By: Team Navakal
Royal Enfield Online Booking

Royal Enfield Online Booking: रॉयल एनफील्डने (Royal Enfield) सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी आपली मोटारसायकल खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. कंपनीने ऑनलाईन विक्रीचा विस्तार करण्यासाठी Amazon India आणि Flipkart या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे.

या भागीदारीमुळे आता ग्राहक त्यांच्या आवडत्या 350cc रेंजमधील रॉयल एनफील्ड बाईक थेट घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकतील.

Royal Enfield: ऑनलाईन मिळणार ‘या’ दमदार बाईक्स

रॉयल एनफील्डची संपूर्ण 350cc रेंज Amazon India वर उपलब्ध असेल. यात क्लासिक 350 (Classic 350), बुलेट 350 (Bullet 350), हंटर 350 (Hunter 350), गोअन क्लासिक 350 (Goan Classic 350) आणि नवीन मेटयोर 350 (Meteor 350) या मॉडेल्सचा समावेश आहे.

ग्राहकांना Amazon India वर असलेल्या एका विशेष ‘रॉयल एनफील्ड ब्रँड स्टोअर’ मधून या बाईक्सची खरेदी करता येईल. खरेदीनंतर, बाईकची डिलिव्हरी आणि विक्रीपश्चात सेवा देण्याची जबाबदारी ग्राहक ज्या शहरातील डीलरशिप निवडेल, त्याची असेल.

Royal Enfield: ऍक्सेसरीज आणि गिअर्स एका क्लिकवर

केवळ बाईक्सच नाही, तर ग्राहक रॉयल एनफील्डच्या ब्रँड पेजवरून जेन्युईन मोटारसायकल ऍक्सेसरीज, रायडिंग गिअर आणि इतर मर्चेंडाइज देखील खरेदी करू शकतील. यामुळे ग्राहकांचा संपूर्ण खरेदीचा अनुभव एकाच क्लिकवर सोपा होणार आहे.

Royal Enfield: या शहरांमध्ये झालीय सुरुवात

सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा 5 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यात अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, नवी दिल्ली आणि पुणे (Pune) यांचा समावेश आहे. तसेच, Flipkart च्या माध्यमातून बेंगळुरू, गुरुग्राम, कोलकाता, लखनऊ आणि मुंबई येथील ग्राहकही या मोटारसायकल्स ऑनलाईन खरेदी करू शकतील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सोप्या आणि लवचिक पेमेंट पर्यायांमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

हे देखील वाचा – सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले…

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या