Royal Enfield Bullet 350 | रॉयल एनफिल्डची बुलेट 350 ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. आता या बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
कंपनीने बाईकच्या नव्या ‘बटालियन ब्लॅक’ व्हेरिएंटच्या समावेशासह काही मॉडेल्सच्या किमतीत 2,000 ते 3,000 रुपयांची वाढ केलीआहे.
नवीन ‘बटालियन ब्लॅक’ व्हेरिएंटची किंमत 1.75 लाख रुपये असून, यात कोणतीही वाढ झालेली नाही. पूर्णपणे काळ्या बॉडीवर्कसह, सोनेरी पिन्स्ट्राइप्स, रेट्रो-स्टाइल टेललाइट, सिंगल सीट आणि मागील ड्रम ब्रेक यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे हे मॉडेल पारंपरिक बुलेट प्रेमींसाठी आकर्षक आहे.
ब्लॅक आणि रेड रंगांमध्ये येणारे ‘मिलिटरी’ व्हेरिएंट आता 1.75 लाख रुपये किमतीत मिळेल, ज्यात 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. ‘स्टँडर्ड’ व्हेरिएंट, जे ब्लॅक आणि मरून रंगांमध्ये आहे, त्याची किंमत 2.00 लाख रुपये झाली असून, यात 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॅगशिप ‘ब्लॅक गोल्ड’ व्हेरिएंटसाठी 2.18 लाख रुपये खर्च करावे लागतील. यात 2,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली. याशिवाय, ‘मिलिटरी सिल्व्हर’ व्हेरिएंट आता बंद करण्यात आले आहे.
बुलेट 350 च्या इतर फीचर्समध्ये फारसा बदल झालेला नाही. बाईक 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह येते, जे 20.2 हॉर्सपॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन बुलेटच्या खास थंपिंग साउंडसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ती रायडर्समध्ये लोकप्रिय आहे.
रॉयल एनफिल्ड लवकरच बुलेट 350 सह संपूर्ण 350 सीसी रेंजमध्ये ‘स्लिप-अँड-असिस्ट क्लच’ सादर करणार आहे. हे फीचर आधी 2025 हंटर 350 मध्ये देण्यात आले होते. हे अपग्रेड विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये रायडिंगचा अनुभव अधिक सुलभ आणि आरामदायी बनवेल, अशी अपेक्षा आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








