Home / लेख / महिन्याला भरा फक्त 12 हजार! घरी घेऊन जा शानदार Royal Enfield Classic 650 बाईक; जाणून घ्या EMI चे गणित

महिन्याला भरा फक्त 12 हजार! घरी घेऊन जा शानदार Royal Enfield Classic 650 बाईक; जाणून घ्या EMI चे गणित

Royal Enfield Classic 650 EMI calculation 2026 : भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही दुचाकी किती लोकप्रिय आहे हे...

By: Team Navakal
Royal Enfield Classic 650 EMI calculation 2026
Social + WhatsApp CTA

Royal Enfield Classic 650 EMI calculation 2026 : भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही दुचाकी किती लोकप्रिय आहे हे सांगण्याची गरज नाही. याच लोकप्रियतेचा विचार करून कंपनीने आता अधिक शक्तिशाली अशा Royal Enfield Classic 650 लाँच केली आहे.

आयकॉनिक रेट्रो लूक आणि 650 सीसीच्या दमदार इंजिनचे कॉम्बिनेशन असलेली ही बाईक सध्या तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशावर महिन्याला किती भार पडेल, हे जाणून घेऊया.

दमदार इंजिन आणि किंमत

रॉयल एनफील्ड क्लासिक 650 मध्ये 648 सीसीचे एअर/ऑईल कूल्ड, पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 47 bhp ची पॉवर आणि 52.3 Nm चा टॉर्क जनरेट करते. आरामदायी क्रूझिंगसाठी डिझाइन केलेल्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3,64,856 रुपयांपासून सुरू होऊन 3,79,252 रुपयांपर्यंत जाते.

मासिक ईएमआयचे गणित (EMI Calculation)

समजा तुम्ही या बाईकचे टॉप मॉडेल खरेदी करत आहात, ज्याची किंमत 3,79,252 रुपये आहे. आम्ही येथे 100% एक्स-शोरूम किमतीवर कर्ज आणि 9.5% व्याजदर गृहीत धरून हिशोब केला आहे:

  1. 12 महिन्यांचा कालावधी: जर तुम्ही एका वर्षासाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा 33,254 रुपये ईएमआय भरावा लागेल. यामध्ये एकूण व्याज 19,798 रुपये इतके असेल.
  2. 24 महिन्यांचा कालावधी: दोन वर्षांच्या कर्ज कालावधीसाठी मासिक ईएमआय 17,413 रुपये असेल. यामध्ये एकूण व्याज 38,664 रुपये भरावे लागेल.
  3. 36 महिन्यांचा कालावधी: तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यास ईएमआय सर्वात कमी म्हणजेच 12,149 रुपये इतका असेल. मात्र, यामध्ये व्याजाची रक्कम 58,096 रुपयांपर्यंत जाईल.

का खास आहे ही बाईक?

क्लासिक 650 ही बाईक इंटरसेप्टर 650 आणि शॉटगन 650 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. मात्र, तिचे ट्यूनिंग अधिक शांत आणि आरामदायी प्रवासासाठी करण्यात आले आहे. क्लासिक 350 चा लूक आवडणाऱ्या पण अधिक वेगाची आणि पॉवरची अपेक्षा ठेवणाऱ्या रायडर्ससाठी हा एक प्रीमियम पर्याय ठरत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या