Home / लेख / Royal Enfield ने लाँच केली नवीन ‘Goan Classic 350’; स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्स, पाहा किती आहे किंमत

Royal Enfield ने लाँच केली नवीन ‘Goan Classic 350’; स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्स, पाहा किती आहे किंमत

Royal Enfield Goan Classic 350 : दुचाकी प्रेमींची लाडकी कंपनी रॉयल एनफील्डने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘Goan Classic 350’ (2026...

By: Team Navakal
Goan Classic 350
Social + WhatsApp CTA

Royal Enfield Goan Classic 350 : दुचाकी प्रेमींची लाडकी कंपनी रॉयल एनफील्डने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘Goan Classic 350’ (2026 एडिशन) लाँच केली आहे. आकर्षक बॉबर लूक आणि दमदार इंजिनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या बाईकमध्ये कंपनीने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अधिक सुखद होणार आहे. रेट्रो लूक कायम ठेवत या बाईकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

काय आहेत नवीन बदल?

2026 मॉडेलमध्ये कंपनीने रायडर्सच्या गरजा लक्षात घेऊन काही विशेष अपडेट्स दिले आहेत:

  • असिस्ट आणि स्लिपर क्लच: सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यामध्ये नवीन स्लिपर क्लच सिस्टम देण्यात आली आहे. यामुळे गिअर बदलणे अधिक सोपे झाले आहे आणि क्लच लिव्हर दाबण्यासाठी कमी ताकद लागते.
  • फास्ट चार्जिंग पोर्ट: बाईकमध्ये असलेला USB टाइप-C पोर्ट आता फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. लांबच्या प्रवासात मोबाईल किंवा इतर उपकरणे वेगाने चार्ज करण्यासाठी याचा उपयोग होईल.

डिझाइन आणि इंजिन क्षमता

या बाईकचा सिग्नेचर बॉबर लूक तसाच ठेवण्यात आला आहे. यामध्ये फ्लोटिंग रायडर सीट, व्हाईटवॉल अल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स आणि चॉपर स्टाईल फेंडर्स देण्यात आले आहेत. बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही तांत्रिक बदल केलेला नाही. यात 349 सीसीचे एअर-ऑईल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे.

किंमत आणि रंग

रॉयल एनफील्ड गोअन क्लासिक 350 च्या विविध रंगांनुसार किमती खालीलप्रमाणे आहेत:

  1. शॅक ब्लॅक आणि पर्पल हेझ: 2,19,787 रुपये (एक्स-शोरूम).
  2. ट्रिप टील ग्रीन आणि रेव रेड: 2,22,593 रुपये (एक्स-शोरूम).

ही बाईक आता देशभरातील सर्व अधिकृत शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आरामदायी प्रवासासाठी आणि शहरात स्टायलिश लूकसह फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या