Home / लेख / Royal Enfield Price Hike: बुलेट प्रेमींना बसणार फटका! रॉयल एनफील्डने Classic 350 आणि Bullet 350 च्या किमती वाढवल्या

Royal Enfield Price Hike: बुलेट प्रेमींना बसणार फटका! रॉयल एनफील्डने Classic 350 आणि Bullet 350 च्या किमती वाढवल्या

Royal Enfield Price Hike: रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या दोन लोकप्रिय मॉडेल्सच्या...

By: Team Navakal
Royal Enfield Price Hike
Social + WhatsApp CTA

Royal Enfield Price Hike: रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या दोन लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ‘क्लासिक 350’ (Classic 350) आणि ‘बुलेट 350’ (Bullet 350) च्या एक्स-शोरूम किमती वाढवल्या आहेत. ही दरवाढ 1,540 रुपयांपासून ते 2,025 रुपयांपर्यंत आहे.

किमतीत किती झाली वाढ?

रॉयल एनफील्डने आपल्या विविध मॉडेल्समध्ये किरकोळ वाढ केली आहे. आता रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची सुरुवातीची किंमत 1,82,658 रुपये झाली आहे, तर बुलेट 350 ची सुरुवातीची किंमत 1,63,793 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, बुलेट 350 च्या ‘मिलिटरी रेड’ व्हेरिएंटच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, ही ग्राहकांसाठी दिलासादायक बाब आहे.

बुलेट 350 चे सुधारित दर:

  • बॅटालियन ब्लॅक: 1,63,793 रुपये (1,632 रुपयांची वाढ)
  • मिलिटरी ब्लॅक: 1,64,423 रुपये (1,628 रुपयांची वाढ)
  • स्टँडर्ड ब्लॅक / मरून: 1,87,038 रुपये (1,851 रुपयांची वाढ)
  • ब्लॅक गोल्ड: 2,04,434 रुपये (2,025 रुपयांची वाढ)

क्लासिक 350 चे सुधारित दर:

  • रेडडिच रेड: 1,82,658 रुपये (1,540 रुपयांची वाढ)
  • हॅल्सीयन ब्लॅक: 1,85,347 रुपये (1,563 रुपयांची वाढ)
  • मद्रास रेड / जोधपूर ब्लू: 1,88,732 रुपये (1,591 रुपयांची वाढ)
  • कमांडो सँड: 2,04,340 रुपये (1,723 रुपयांची वाढ)
  • स्टेल्थ ब्लॅक: 2,12,856 रुपये (1,794 रुपयांची वाढ)

इंजिन आणि मेकॅनिकल बदल

जरी किमतीत वाढ झाली असली, तरी दोन्ही गाड्यांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही मॉडेल्समध्ये 349cc चे एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर जे-सिरीज इंजिन कायम आहे. हे इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm चा टॉर्क निर्माण करते. दमदार परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेसाठी हे इंजिन ओळखले जाते. रॉयल एनफील्डच्या या दोन्ही गाड्या भारतीय तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

हे देखील वाचा – MG Windsor EV : टाटा मोटर्सला मोठा धक्का! ‘ही’ ठरली 2025 मधील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार; पाहा खासियत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या