Samsung Galaxy Book 5: सॅमसंगने भारतात आपला नवा लॅपटॉप Samsung Galaxy Book 5 लाँच केला आहे. कंपनीने याला आतापर्यंतचा आपला सर्वात स्वस्त एआय-पॉवर्ड लॅपटॉप म्हटले आहे. हा नवा डिव्हाइस गॅलेक्सी बुक सीरिजमध्ये सामील झाला असून, यात अनेक शानार फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy Book 5 चे फीचर्स
- डिस्प्ले: यात 15.6 इंचचा फुल एचडी डिस्प्ले असून त्याला अँटी-ग्लेअर कोटिंग दिली आहे.
- प्रोसेसर: लॅपटॉपमध्ये इंटेलचा लेटेस्ट कोर अल्ट्रा 5 आणि कोर अल्ट्रा 7 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो एआयच्या कामांसाठी डिझाइन केलेला आहे.
- ग्राफिक्स: सॅमसंगचा दावा आहे की, हा नवा मॉडेल त्याच्या आधीच्या Galaxy Book 4 च्या तुलनेत 38 टक्के अधिक चांगला ग्राफिक्स परफॉर्मन्स देतो.
- डिझाइन: लॅपटॉप अधिक पातळ आणि हलका असून, यात कनेक्टिव्हिटीही चांगली आहे.
- बॅटरी: यात 61.2Wh ची बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 19 तास व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते.
Samsung Galaxy Book 5: एआय फीचर्स
- एआय फोटो रीमास्टर: हे फीचर मशीन लर्निंगचा वापर करून इमेजची गुणवत्ता सुधारते.
- एआय सिलेक्ट: या फीचरमुळे वापरकर्ते स्क्रीनवरील कोणताही एलिमेंट त्वरित शोधू शकतात.
- सर्कल टू सर्च: हे फीचर सॅमसंग फोन्सप्रमाणेच पीसीवरही उपलब्ध आहे.
- ट्रान्सक्रिप्ट असिस्ट: हे टूल मीटिंग्ज किंवा रेकॉर्ड केलेल्या कंटेंटचा ट्रान्सक्रिप्ट तयार करते.
Samsung Galaxy Book 5: किंमत आणि उपलब्धता
सॅमसंगने हा लॅपटॉप चार व्हेरिएंटमध्ये आणि ग्रे कलरमध्ये सादर केला आहे. Galaxy Book 5 ची सुरुवातीची किंमत 77,990 रुपये आहे. ग्राहकांना यावर 10,000 रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक आणि 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळत आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…