50MP सेल्फी कॅमेरा आणि सुपरफास्ट चार्जिंग, 20 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय Samsung चा ‘हा’ जबरदस्त फोन

Samsung Galaxy F55 5G

Samsung Galaxy F55 5G | बाजारात 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही देखील या बजेटमध्ये फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy F55 5G चा विचार करू शकता.

50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग असलेला Samsung Galaxy F55 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, 31 मे पर्यंत तुम्ही हा फोन सर्वोत्तम ऑफर्ससह खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत 20,999 रुपये आहे.

फोन खरेदी करताना जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट मिळेल. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 12,700 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह खरेदी करू शकता. मात्र, एक्सचेंज ऑफरमधील डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनची कंडिशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनची किंमत अजूनच कमी होते.

Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स:

कंपनी या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.7 इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याचा पीक ब्राइटनेस लेव्हल 1000 निट्सचा आहे. फोन 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजच्या पर्यायांमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 50 मेगापिक्सलचा मेन लेन्स, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर चा समावेश आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये कंपनी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, जी 45 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचं झाल्यास, फोन अँड्रॉइड 14 वर आधारित वनयूआय 6.1 वर काम करतो. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन IP67 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो. दमदार साउंडसाठी फोनमध्ये डॉल्बी ॲटमॉस देण्यात आला आहे.