Samsung Galaxy M07: Samsung कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवा बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M07 लाँच केला आहे. हा फोन आकर्षक किंमत आणि दमदार फीचर्समुळे चर्चेत आहे. कमी किंमत असूनही यात दिलेले उत्कृष्ट सॉफ्टवेअर सपोर्टचे आश्वासन याला खास बनवते.
Samsung Galaxy M07 ची किंमत
Samsung Galaxy M07 ची सुरुवातीची किंमत 6999 रुपये आहे. ही किंमत 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हा फोन Android 15 (आधारित One UI) ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. कंपनीने यासोबत 6 OS अपडेट्स आणि 6 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स (Security Updates) देण्याचे आश्वासन दिले आहे.
Samsung Galaxy M07 चे फीचर्स
या बजेट स्मार्टफोनमध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्ये (Specifications) समाविष्ट आहेत, जी त्याला या किंमत श्रेणीत एक उत्तम पर्याय बनवतात:
- चिपसेट: MediaTek Helio G99 ऑक्टा-कोर चिपसेट.
- डिस्प्ले : 6.7 इंचाची HD+ LCD स्क्रीन.
- रिफ्रेश रेट : 90Hz रिफ्रेश रेट, ज्यामुळे स्क्रोलिंग स्मूथ होते.
- बॅटरी : 5,000mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी.
- चार्जिंग : 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट.
- मुख्य कॅमेरा : 50MP (मुख्य लेन्स) + 2MP (डेप्थ सेन्सर) चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप.
- सेल्फी कॅमेरा: 8MP चा फ्रंट कॅमेरा.
- सुरक्षा : IP54 रेटिंग (धूळ आणि पाण्याचे स्प्लॅश प्रतिरोधक).
- इतर कनेक्टिव्हिटी: साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm हेडफोन जॅक, USB-C पोर्ट आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी.
हे देखील वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! गौतम अदानींची घोषणा