Samsung Galaxy M35 Price: तुम्ही Samsung चा नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा 3,000 रुपये स्वस्त झाला आहे.
हा फोन आता Amazon India वर 18,449 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊन तुम्ही आणखी सूट मिळवू शकता.
Samsung Galaxy M35 5G च्या 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची लाँचिंग किंमत 21,499 रुपये होती. या फोनवर 924 रुपये पर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. अशाप्रकारे तुम्ही फोन मूळ किंमतीपेक्षा 3 हजार रुपये स्वस्तात खरेदी करू शकता.
Samsung Galaxy M35 5G ची वैशिष्ट्ये
- डिस्प्ले: यात 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे आणि सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस+ देण्यात आले आहे.
- प्रोसेसर: फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट वापरण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा परफॉर्मन्स चांगला मिळतो.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा मेन लेन्स, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: यात 6,000mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 25W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी: सुरक्षिततेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3 आणि USB Type-C पोर्ट असे पर्याय आहेत.
- हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर चालतो. तसेच, स्टिरिओ स्पीकरसह डॉल्बी ऑडिओची (Dolby Audio) सुविधाही यात आहे.
हे देखील वाचा –
5 वर्षांनंतर TikTok ची भारतात होणार एन्ट्री? सरकारने दिली महत्त्वाची माहिती
‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण