Samsung Galaxy S24 FE: प्रीमियम फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेऱ्यामुळे चर्चेत असलेल्या Samsung च्या Galaxy S24 FE स्मार्टफोनची खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कंपनीने ग्राहकांना खास भेट दिली आहे.
सध्या हा फ्लॅगशिप डिव्हाईस फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध असून, त्याची प्रभावी किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. दमदार Exynos चिपसेट आणि AMOLED डिस्प्ले असलेला हा फोन आता या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू देणारा ठरत आहे. या आकर्षक डील बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
Samsung Galaxy S24 FE ची फ्लिपकार्टवर किंमत:
- किंमत कपात: फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24 FE सध्या एमआरपी किमतीपेक्षा 26,000 रुपयांच्या मोठ्या कपातीनंतर 33,999 रुपयांना उपलब्ध आहे.
- बँक ऑफर आणि EMI: याव्यतिरिक्त, ग्राहकांना येथे बँक ऑफर्स देखील मिळत आहेत, ज्यामुळे प्रभावी किंमत आणखी कमी होईल. येथे 5,667 रुपयांपासून सुरू होणारे नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत.
- एक्सचेंज ऑफर: एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहक त्यांच्या जुन्या स्मार्टफोनला ब्रँड, मॉडेल आणि स्थितीनुसार 26,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह ट्रेड-इन करू शकतात.
Samsung Galaxy S24 FE ची प्रमुख वैशिष्ट्ये:
Samsung Galaxy S24 FE मध्ये 6.7-इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह विजुअल्स स्मूद ठेवतो. हा फोन Samsung च्या इन-हाउस Exynos 2400e चिपसेटवर चालतो, जो मल्टीटास्किंग सुरळीत ठेवण्यासाठी 8GB RAM सह येतो. डिव्हाईसमध्ये 4,700mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात रियरला 50MP मेन सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 8MP टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. तर समोरच्या बाजूला 10MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – India vs South Africa Final: यंदा नवा वर्ल्ड चॅम्पियन! भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषक फायनल कधी आणि कुठे होणार?
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








