Samsung Smartphone Offer | नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सॅमसंग इंडियाने (Samsung ) भारतीय बाजारपेठेत Galaxy S24 आणि Galaxy S24 FE या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे.
Galaxy S25 सीरिज लवकरच बाजारात येत असल्यामुळे आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये चिनी ब्रँड्सच्या वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या नवीन किमती आणि सवलतींबद्दल जाणून घेऊया.
Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 FE वर मिळेल बंपर सूट
Galaxy S24: ची लाँच किंमत
- 8GB + 128GB: ₹74,999
- 8GB + 256GB: ₹79,999
- 8GB + 512GB: ₹89,999
सवलतीनंतरची किंमत (Flipkart) –
- 8GB + 128GB: ₹44,999 (₹30,000 ची सूट)
- 8GB + 256GB: ₹50,999 (₹29,000 ची सूट)
- 8GB + 512GB: ₹62,999 (₹27,000 ची सूट)
Galaxy S24 FE: मूळ लाँच किंमत –
- 8GB + 128GB: ₹59,999
- 8GB + 256GB: ₹65,999
सवलतीनंतरची किंमत (Flipkart) –
- 8GB + 128GB: ₹34,999 (₹25,000 ची सूट)
- 8GB + 256GB: ₹40,999 (₹25,000 ची सूट)
सॅमसंग Galaxy S24 सीरिज भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच झाली होती. त्यामुळे आता हे मॉडेल थोडे जुने झाले आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर (Flipkart) या डिव्हाइसला आतापर्यंतच्या सर्वोत्तम किमतीत उपलब्ध आहे. यासोबतच, Axis Flipkart कार्डद्वारे खरेदी केल्यास यूजर्सला 5% कॅशबॅकचा अतिरिक्त लाभ मिळेल.
इतर ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) पर्यायांसाठी यूजर्स Amazon आणि Samsung च्या वेबसाइट किंवा ई-स्टोअरला देखील भेट देऊ शकतात.