Samsung Galaxy S24 Ultra हा फोन दमदार कॅमेरा सिस्टीम, शक्तिशाली प्रोसेसर आणि अत्याधुनिक फीचर्समुळे हा फोन आजही बाजारात लोकप्रिय आहे. तुम्ही सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy S24 Ultra नक्कीच चांगला पर्याय आहे.
विशेष म्हणजे हा फोन Flipkart वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. चला तर मग, या शानदार डीलविषयी आणि फोनच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया.
Samsung Galaxy S24 Ultra वर मोठी सूट
Samsung Galaxy S24 Ultra चे 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेले मॉडेल Flipkart वर 1,29,990 रुपये मूळ किंमतीऐवजी थेट 79,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्हाला या फोनवर तब्बल 50,000 रुपयांची मोठी सूट मिळत आहे.
यावर आणखी सूट मिळवण्यासाठी, तुम्ही Flipkart Axis Bank किंवा Flipkart SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला प्रत्येक तिमाहीत 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो. हा एक शक्तिशाली फ्लॅगशिप फोन असून, 80,000 रुपयांच्या आसपासच्या किमतीत तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Samsung Galaxy S24 Ultra चे फीचर्स
- डिस्प्ले: यात 6.8 इंचाचा डायनॅमिक एलटीपीओ एमोलेड 2X डिस्प्ले असून, तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरवर काम करतो.
- कॅमेरा: यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 200MP प्रायमरी सेन्सर, 50MP पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेराही यात दिला आहे.
- बॅटरी: या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून, 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
इलेक्ट्रिक वाहन धारकांना मोठा दिलासा, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन EV चार्जिंग स्टेशन्स
अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; व्हिसाचे नियम बदलले, ‘या’ चुका महागात पडणार
Dcm Ajit Pawar: डीवायएसपींनी ओळखले नाही ; अजित पवार प्रचंड संतापले