Samsung Galaxy S25 Edge Price Cut : सॅमसंगने (Samsung) काही महिन्यांपूर्वीच जागतिक बाजारात आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस 25 एज (Samsung Galaxy S25 Edge) लॉन्च केला होता. आता लॉन्चिंगनंतर अवघ्या काही दिवसांतच या हँडसेटच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस 25 एजची जाडी केवळ 5.8mm आहे, तर या सीरीजमधील सॅमसंग गॅलेक्सी एस 25 ची जाडी 7.2mm मिळते. हा फोन 200MP रियर कॅमेरा सेटअपसह येतो.
Samsung Galaxy S25 Edge : किंमत आणि बचत
सॅमसंग गॅलेक्सी एस 25 एज 5G स्मार्टफोन विजय सेल्स या प्लॅटफॉर्मवर 93,644 रुपयांना सूचीबद्ध आहे. लॉन्चिंगच्या वेळी याच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या सुरुवातीच्या वेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये होती. सध्याच्या ऑफरमध्ये ग्राहकांना थेट 16 हजार रुपयांची बचत होत आहे. ही सवलत (Offer) मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S25 Edge : ची वैशिष्ट्ये
सॅमसंगचा हा स्लिम फोन अनेक पॉवरफुल वैशिष्ट्यांसह येतो:
डिस्प्ले: यात 6.7-इंच क्वाड एचडी+ डायनॅमिक एमोलेड 2X डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz मिळतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 चा उपयोग केला आहे.
प्रोसेसर: सॅमसंग गॅलेक्सी एस 25 एजमध्ये क्वालकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट (Chipset) वापरला आहे.
कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 200MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
हे देखील वाचा – Ind vs SA : विराट की सचिन? एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कोण? सुनील गावस्कर म्हणाले…









