Samsung Foldable Smartphone offer: तुम्ही बऱ्याच काळापासून फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ॲमेझॉनचा (Amazon) ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल’ सेल (Great Freedom Festival Sale) तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आला आहे.
या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.याच सेलमध्ये सॅमसंगचा (Samsung Foldable Smartphone offer) फोल्डेबल फोनही खूप स्वस्त किंमतीत मिळत आहे.
जर तुम्ही तुमचा जुना फोन फोल्डेबल फोनमध्ये बदलण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुम्ही सोडू नका सॅमसंग कंपनी त्यांच्या Galaxy Z Fold 6 5G या फोल्डेबल फोनवर 40,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 वरील ऑफर
सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर Galaxy Z Fold 6 ची सुरुवातीची किंमत 1,64,999 रुपये आहे. पण ॲमेझॉनच्या सेलमध्ये तुम्ही हा फोन फक्त 1,20,999 रुपयांना खरेदी करू शकता. याचा अर्थ ॲमेझॉन या फोल्डेबल फोनवर 40,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे.
याशिवाय, तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून 47,150 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळवू शकता. तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार ही किंमत कमी-जास्त होऊ शकते.
Samsung Galaxy Z Fold 6 चे स्पेसिफिकेशन्स
- प्रोसेसर: या फोल्डेबल फोनमध्ये शक्तिशाली ‘स्नॅपड्रॅगन 8 जेन 3’ (Snapdragon 8 Gen 3) प्रोसेसर आहे.
- डिस्प्ले: यात 7.6 इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि 6.3 इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळतो. दोन्ही डिस्प्ले ‘डायनॅमिक अॅमोलेड 2एक्स’ (पॅनेलसह 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतात.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स असे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी: यात 4400 mAh ची बॅटरी आणि 25W चार्जिंगचा सपोर्ट आहे.