Home / लेख / Samsung Galaxy Z Fold 6 वर बंपर डिस्काउंट! तब्बल 60 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा फोल्डिंग फोन

Samsung Galaxy Z Fold 6 वर बंपर डिस्काउंट! तब्बल 60 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा फोल्डिंग फोन

Samsung Galaxy Z Fold 6: तुम्ही जर नवीन फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे....

By: Team Navakal
Samsung Galaxy Z Fold 6

Samsung  Galaxy Z Fold 6: तुम्ही जर नवीन फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या सॅमसंगच्या फोल्डिंग फोनवर एक जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 वर तब्बल 60,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट मिळत आहे. इतकेच नाही, तर या फोनवर तुम्हाला कार्ड आणि कूपन सवलतदेखील वेगळी मिळेल.

Samsung Galaxy Z Fold 6 कुठे आणि किती स्वस्त मिळत आहे?

Samsung Galaxy Z Fold 6 तुम्ही 60,000 रुपयांच्या भरघोस डिस्काउंटसह Amazon वर खरेदी करू शकता. या फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरियंटची मूळ किंमत 1,64,999 रुपये आहे.

सध्या हा फोन फक्त 1,03,999 रुपयांमध्ये मिळत आहे. याशिवाय, तुम्ही Amazon Pay ICICI Bank Credit Card चा वापर केल्यास तुम्हाला 5,199 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकदेखील मिळू शकतो. यामुळे हा फोल्डिंग फोन तुम्हाला 1,00,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतो.

कार्ड नसतानाही मिळेल अतिरिक्त सूट

जर तुमच्याकडे अतिरिक्त सवलतीसाठी कोणतेही बँक कार्ड नसेल, तरीही तुम्ही कमीत कमी 3,000 रुपयांची सूट मिळवू शकता. कारण Amazon वर हा फोन खरेदी करताना 3,000 रुपयांचे कूपन लागू करता येते. हे कूपन लागू करण्यासाठी कोणतीही विशेष अट नाही, ते सध्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही कार्ड कॅशबॅक आणि कूपन अशा दोन्ही ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.

2025 मध्येही Galaxy Z Fold 6 घेणे फायदेशीर

Samsung Galaxy Z Fold 6 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे झाल्यास यात 7.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असल्यामुळे, तो 2025 मध्येही उत्तम प्रकारे काम करेल.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10MP चा टेलीफोटो लेन्स आहे. याचा सेल्फी कॅमेरा 10MP चा आहे.

हे देखील वाचा – ‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या