Samsung Galaxy Z Fold 6 Discount : अनेक स्मार्टफोन युजर्स आता ‘प्रीमियम’ आणि ‘युनिक’ फोनच्या शोधात आहेत. तुम्हीही नेहमीच्या डिझाइनला कंटाळला असाल आणि अत्याधुनिक फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
कारण Flipkart वर ‘बिग बचत डेज सेल’ची धूम सुरू झाली आहे. हा सेल 5 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून, यामध्ये Samsung Galaxy Z Fold 6 5G या फ्लॅगशिप फोल्डेबल फोनवर इतकी मोठी सूट मिळत आहे की, तुमचा खरेदीचा प्लॅन लगेच पक्का होईल.
बाजारात जवळपास ₹1,65,000 किंमत असलेला हा फोन सध्याच्या सेलमध्ये फक्त ₹1,03,999 मध्ये उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्स आणि एका खास एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, तुम्ही हा फोन ₹1,00,000 पेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकता. या शानदार डीलचे सर्व तपशील खालीलप्रमाणे आहेत.
Samsung Galaxy Z Fold 6 5G वर उपलब्ध सूट
Samsung Galaxy Z Fold 6 5G ची मूळ किंमत ₹1,64,999 आहे. Flipkart च्या ‘बिग बचत डेज सेल’ मध्ये हा फोन थेट ₹1,03,999 मध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे.
- बँक ऑफर: Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास, तुम्हाला ₹4,000 पर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
- एक्सचेंज ऑफर: यावर एक अत्यंत आकर्षक एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामध्ये जुन्या फोनच्या बदल्यात तब्बल ₹56,600 पर्यंतचा मोठा डिस्काउंट मिळू शकतो. या एक्सचेंज व्हॅल्यूसाठी तुमचा जुना फोन कोणत्या स्थितीत आहे आणि त्याचे मॉडेल काय आहे, हे तपासले जाईल. विशेषत: जर तुम्ही iPhone सारखे फोन एक्सचेंज करत असाल, तर तुम्हाला सर्वाधिक लाभ मिळून हा फोल्डेबल फोन अत्यंत कमी किंमतीत मिळू शकतो.
Samsung Galaxy Z Fold 6 5G चे वैशिष्ट्ये
फीचर्सच्या बाबतीत हा फोल्डेबल फोन अत्यंत दमदार आहे.
कॅमेरा सेटअप: यात 50-मेगापिक्सलचा मुख्य (प्रायमरी) कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 10-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 10-मेगापिक्सल आणि 4-मेगापिक्सल असे दोन सेन्सर्स देण्यात आले आहेत.
डिस्प्ले: यात बाहेरच्या बाजूला 6.3-इंच आकाराचा AMOLED डिस्प्ले आणि आतमध्ये मुख्य 7.6-इंच आकाराचा AMOLED पॅनल देण्यात आला आहे. या दोन्ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.
प्रोसेसर आणि मेमरी: या डिव्हाइसला Snapdragon 8 Gen 3 चिपसेटची ताकद मिळाली आहे. यात 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळतो.
बॅटरी: फोनमध्ये 4400mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा – ISRO CMS-03 : ISRO ची नवी झेप! नौदलासाठीचा महत्त्वपूर्ण उपग्रह अवकाशात; भारतीय अंतराळ क्षेत्राला कसा फायदा होणार?









