Home / लेख / Samsung चा मोठा धमाका! Galaxy Z Fold 6 वर चक्क 55,000 रुपयांची घसघशीत सूट; पाहा नवीन किंमत आणि फीचर्स

Samsung चा मोठा धमाका! Galaxy Z Fold 6 वर चक्क 55,000 रुपयांची घसघशीत सूट; पाहा नवीन किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy Z Fold 6 Discount : तुम्ही जर साध्या स्मार्टफोनला कंटाळला असाल आणि आता एक स्टायलिश फोल्डेबल फोन घेण्याचे...

By: Team Navakal
Samsung Galaxy Z Fold 6
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy Z Fold 6 Discount : तुम्ही जर साध्या स्मार्टफोनला कंटाळला असाल आणि आता एक स्टायलिश फोल्डेबल फोन घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ॲमेझॉनने तुमच्यासाठी नवीन वर्षाची जबरदस्त भेट आणली आहे.

सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 6 सध्या चक्क 55,000 रुपयांच्या सवलतीत मिळत आहे. लाँचिंग वेळी 1,64,999 रुपये किंमत असलेला हा फोन आता तुम्ही 1,10,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत आपलासा करू शकता.

दमदार स्पेसिफिकेशन्स आणि डिस्प्ले

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिस्प्ले: या फोनमध्ये दोन स्क्रीन आहेत. बाहेरच्या बाजूला 6.3 इंच आणि आतल्या बाजूला 7.6 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्क्रीन डायनॅमिक एमोलेड 2X तंत्रज्ञानावर आधारित असून 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.

प्रोसेसर आणि बॅटरी: हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 या अतिशय शक्तिशाली प्रोसेसरने सुसज्ज आहे. बॅटरीच्या बाबतीत यात 4400mAh ची मोठी बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत आणि जबरदस्त ऑफर्स

ॲमेझॉनवर या फोनची मूळ किंमत 1,64,999 रुपये असली तरी, कोणत्याही बँक ऑफरशिवाय तो थेट 1,09,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना 5,000 रुपयांचे अतिरिक्त कूपन डिस्काउंट देखील मिळत आहे.

बँक ऑफर्सचा विचार केल्यास, ॲमेझॉन आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 3,299 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि फेडरल बँक कार्डवर 1,500 रुपयांची सूट मिळू शकते. इतकेच नाही तर, जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 44,300 रुपयांपर्यंतचे मूल्य मिळू शकते, जे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

हे देखील वाचा – Municipal Corporation Election 2026 : निवडणुकांआधीच महायुतीचा गुलाल! राज्यातील 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध; भाजपची मोठी मुसंडी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या