Samsung Android 16 Update: सॅमसंगने (Samsung) आपल्या जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोन युजर्सला लेटेस्ट अपडेट्स देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आता मागील फ्लॅगशिप लाइनअप असलेल्या Samsung Galaxy S23 Series साठी Android 16 वर आधारित OneUI 8चे मोठे अपडेट रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.
या अपडेटमुळे जुन्या फोनमध्येही युजर्सना अनेक लेटेस्ट फीचर्स आणि सुधारणांचा फायदा मिळणार आहे.
काय आहे OneUI 8 अपडेटमध्ये खास?
नवीन OneUI 8 अपडेट केवळ Samsung Galaxy S23 साठीच नाही, तर Samsung Galaxy S23 Plus आणि प्रीमियम Samsung Galaxy S23 Ultra या सर्व मॉडेल्ससाठी उपलब्ध होत आहे. सुमारे 3.3GB इतक्या मोठ्या साइजच्या या अपडेटमुळे युजर्सना नवीन इंटरफेस आणि सिस्टीम स्टेबिलिटी मध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे.
या अपडेटसह सप्टेंबर 2025 चा सिक्युरिटी पॅचही समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे फोनमधील अनेक सुरक्षा त्रुटी दूर झाल्या आहेत. कंपनीने युजर्सना हे अपडेट लगेच इन्स्टॉल करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्यांच्या डिव्हाइसला उत्तम परफॉर्मन्स आणि बॅटरी ऑप्टिमायझेशनचा फायदा मिळेल. या अपडेटचा फर्मवेअर व्हर्जन S91xBXXU8EYI5 असा आहे.
असे करा लेटेस्ट अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल
ज्या युजर्सना अजून हे अपडेट मिळाले नसेल, ते पुढील सोप्या पद्धतीने तपासू आणि डाउनलोड करू शकतात:
- सर्वात प्रथम, आपल्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
- त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनवर टॅप करा.
- आता Download and Install या पर्यायाची निवड करा.
- जर तुमच्या डिव्हाइससाठी लेटेस्ट अपडेट उपलब्ध असेल, तर ते आपोआप डाउनलोड होईल आणि इन्स्टॉल होईल.
- अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर डिव्हाइस ऑटोमॅटिक रिस्टार्ट होईल आणि तुम्ही नवीन फीचर्सचा आनंद घेऊ शकाल.
हे देखील वाचा– ‘…तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही’; लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचा थेट इशारा