Home / लेख / Brain Health: गोष्टी विसरताय? स्मरणशक्ती तल्लख करण्यासाठी आजच करा ‘हे’ 5 सोपे व्यायाम

Brain Health: गोष्टी विसरताय? स्मरणशक्ती तल्लख करण्यासाठी आजच करा ‘हे’ 5 सोपे व्यायाम

Brain Health: आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कामे करताना केवळ शरीरच नाही, तर आपला मेंदूही थकत असतो. एखाद्या खोलीत गेल्यावर आपण...

By: Team Navakal
Brain Health
Social + WhatsApp CTA

Brain Health: आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कामे करताना केवळ शरीरच नाही, तर आपला मेंदूही थकत असतो. एखाद्या खोलीत गेल्यावर आपण तिथे कशासाठी आलो होतो हे विसरणे, किंवा ओळखीच्या व्यक्तीचे नाव ओठावर असूनही आठवणीत न येणे, ही मेंदूला थकवा जाणवल्याची काही लक्षणे आहेत. आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो, पण जर असे वारंवार होत असेल, तर ही तुमच्या मेंदूने दिलेली धोक्याची घंटा असू शकते.

तुमच्या मेंदूला अधिक कार्यक्षम आणि तल्लख बनवण्यासाठी तुम्ही खालील सोपे उपाय करू शकता:

१. एकाच वेळी दोन कामे करणे

मेंदूला चॅलेंज देण्यासाठी ‘ड्युअल टास्किंग’ हा एक उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ, चालताना उलट्या क्रमाने आकडे मोजणे किंवा गाणी ऐकत घरची कामे करणे. यामुळे मेंदूच्या नसांमधील ताळमेळ सुधारतो आणि तुमची एकाग्रता वाढते.

२. विजुअल मेमरी टेस्ट

तुमचे निरीक्षण सुधारण्यासाठी हा सराव करा. एखादे चित्र किंवा खोलीतील वस्तूंना 30 सेकंद नीट न्याहाळा. त्यानंतर डोळे मिटून कोणत्या वस्तू कुठे होत्या आणि त्यांचा रंग काय होता, हे आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे बारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता वाढते.

३. माहितीचे तुकडे करणे

कोणतीही मोठी माहिती किंवा मोबाईल नंबर रट्टा मारून लक्षात ठेवण्याऐवजी, त्याचे छोटे भाग करा. उदाहरणार्थ, 10 अंकी मोबाईल नंबरला 3-3 च्या गटात विभागून लक्षात ठेवा. या पद्धतीमुळे तुमची ‘वर्किंग मेमरी’ वेगवान होण्यास मदत होते.

४. श्वसनावर लक्ष केंद्रित करा

दिवसभरातून केवळ 10 मिनिटे शांत बसून आपला पूर्ण ध्यास श्वासावर लावा. मन इकडे-तिकडे भटकू न देता केवळ श्वासाच्या गतीवर लक्ष ठेवा. या व्यायामामुळे मेंदूचा निर्णय घेणारा भाग सक्रिय होतो आणि मानसिक शांतता लाभते.

५. नेहमी काहीतरी नवीन शिका

मेंदूला तरुण ठेवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे नवीन गोष्टी शिकत राहणे. एखादी नवीन भाषा, वाद्य वाजवणे किंवा अगदी ऑफिसला जाण्यासाठी रोजचा रस्ता बदलणे, अशा छोट्या बदलांमुळे मेंदूमध्ये नवीन कनेक्शन तयार होतात. यामुळे वाढत्या वयानुसार होणारे विसरभोळेपणाचे आजार टाळता येतात.

मेंदूचे आरोग्य हे शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरील सवयींचा आपल्या जीवनशैलीत समावेश केल्यास तुमची स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता नक्कीच सुधारेल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या