Skoda Kylaq Price Cut: देशातील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्कोडा (Skoda) कंपनीने Kylaq कारच्या माध्यमातून पुन्हा जोरदार एंट्री घेतली आहे. 2024 च्या अखेरीस लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या कारने बाजारात आपली पकड घट्ट केली आहे.
जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या 8 महिन्यांच्या काळात स्कोडाने एकूण 46,000 कार्सची विक्री केली, ज्यात Kylaq चा वाटा तब्बल 65% आहे. या लोकप्रिय मॉडेलने आतापर्यंत 30,000 हून अधिक युनिट्सची विक्री करत कंपनीसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरवली आहे.
10 लाखांच्या सेगमेंटमध्ये स्कोडाचा ‘मास्टरस्ट्रोक’
स्कोडा कंपनीने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या महत्त्वाच्या सेगमेंटमध्ये Kylaq ला आणले आहे. यापूर्वी त्यांची Fabia ही कार बंद झाल्यानंतर या रेंजमध्ये स्कोडाची कोणतीही कार नव्हती. Kylaq ने केवळ नवीन ग्राहकच जोडले नाहीत, तर स्कोडाला छोट्या बाजारपेठांमध्येही लोकप्रिय केले आहे.
Skoda Kylaqच्या नव्या किमती
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने कायलाकच्या विविध मॉडेल्सच्या किमतीत कपात केली आहे.
1.0L टर्बो पेट्रोल – मॅन्युअल
व्हेरिएंट (Variant) | जुनी किंमत (रुपये) | कपातीची रक्कम (रुपये) | नवी किंमत (रुपये) | कपातीची टक्केवारी (%) |
Classic | 8,25,000 | 70,349 | 7,54,651 | -8.53% |
Signature | 9,85,000 | 85,100 | 8,99,900 | -8.64% |
Signature Plus | 11,30,000 | 96,357 | 10,33,643 | -8.53% |
Prestige | 12,94,000 | 1,10,341 | 11,83,659 | -8.53% |
1.0L टर्बो पेट्रोल – ऑटो (TC)
व्हेरिएंट (Variant) | जुनी किंमत (रुपये) | कपातीची रक्कम (रुपये) | नवी किंमत (रुपये) | कपातीची टक्केवारी (%) |
Signature | 10,95,000 | 95,100 | 9,99,900 | -8.68% |
Signature Plus | 12,40,000 | 1,05,736 | 11,34,264 | -8.53% |
Prestige | 13,99,000 | 1,19,295 | 12,79,705 | -8.53% |