Smart TV Buying Guide : आजकाल बाजारात उपलब्ध असलेले स्मार्ट टीव्ही मनोरंजनाचे प्रमुख साधन बनले आहेत. ओटीटी ॲप्सचा वापर वाढल्यामुळे ग्राहक आता साध्या टीव्हीऐवजी आधुनिक वैशिष्ट्यांसह येणारे स्मार्ट टीव्हीच पसंत करत आहेत. पण काही टीव्ही केवळ नावापुरते स्मार्ट असतात. त्यामुळे नवीन टीव्ही घेताना खालील 5 गोष्टींची खात्री करून घ्या. यामुळे तुमचा अनुभव अधिक चांगला होईल आणि नंतर कोणताही पश्चात्ताप होणार नाही.
1. स्क्रीन आणि रि-फ्रेश रेट
टीव्ही निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्क्रीन आणि त्याचा रि-फ्रेश रेट. स्क्रीनची गुणवत्ता चांगली असावी यासाठी किमान आयपीएस किंवा व्हीए पॅनल निवडा. यामुळे रंग अधिक स्पष्ट दिसतात. याव्यतिरिक्त, टीव्हीचा रि-फ्रेश रेट किमान 60 हर्ट्झ असणे आवश्यक आहे, ज्यामुळे स्क्रीनवरील हालचाल विना-अडथळा दिसते.
2. ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप सपोर्ट
टीव्ही कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, हे तपासा. तो अँड्रॉइड आधारित आहे की गूगल आधारित. अँड्रॉइड आणि गूगल ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या टीव्हीमध्ये ॲप्सची मोठी श्रेणी उपलब्ध असते. याशिवाय, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार यांसारखे सर्व लोकप्रिय ॲप्स टीव्हीवर व्यवस्थित चालतात की नाही, हे देखील तपासून घ्या.
3. प्रोसेसर, मेमरी आणि इंटर्नल स्टोरेज
टीव्हीच्या कार्यक्षमतेसाठी त्याचा प्रोसेसर आणि मेमरी महत्त्वाची आहे. टीव्हीमध्ये किमान 2 गीगाबाईट मेमरी आणि 8 गीगाबाईट ते 16 गीगाबाईटपर्यंतची अंतर्गत साठवणूक असावी. यामुळे ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम सहजपणे चालतात.
4. आवाजाची उत्कृष्टता
टीव्हीमध्ये चित्र जितके महत्त्वाचे आहे, तितकाच उत्तम आवाज देखील आवश्यक आहे. टीव्ही खरेदी करण्यापूर्वी त्याचे स्पीकर किती शक्तीचा आवाज देतात आणि त्यात डॉल्बी ऑडिओ किंवा डीटीएस तंत्रज्ञानाचा सपोर्ट आहे की नाही, हे पाहा. आवाजाची गुणवत्ता चांगली नसल्यास, तुम्हाला नंतर अतिरिक्त पैसे खर्च करून साउंडबार विकत घ्यावा लागेल.
5. कनेक्टिव्हिटी पर्याय
टीव्हीमध्ये उपलब्ध असलेल्या कनेक्टिव्हिटीचा पर्याय तपासणे अनेकदा लोक विसरतात. टीव्हीमध्ये एचडीएमआय 2.0 किंवा 2.1 जोडणीची सोय आहे की नाही, हे तपासा. यासोबतच, यूएसबी जोडणी, ब्लूटूथ आणि दुहेरी बँड वायफायचा सपोर्ट देखील उपलब्ध असावा.
हे देखील वाचा – IRCTC Jyotirlinga Yatra : एकाच प्रवासात करा 7 प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन! IRCTC ने केले विशेष टूर पॅकेज जाहीर









