Smartphone Under 15000: सध्या 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये हाय-एंडडिव्हाइसेसवर मिळणारे फीचर्स उपलब्ध होत आहेत. जवळपास दर आठवड्याला होणाऱ्या नवीन लॉन्चमुळे बाजारात योग्य स्मार्टफोन निवडणे ग्राहकांसाठी गोंधळात टाकणारे ठरते.
तुम्ही देखील कमी बजेट चांगला स्मार्टफोन (Smartphone Under 15000) शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाटी अशाच फोन्सची यादी घेऊन आलो आहोत.
Smartphone Under 15000: हे आहेत 15 हजार रुपयांच्या बजेटमधील टॉप-5 स्मार्टफोन
Honor X7C
Honor X7C 5G मध्ये 6.8-इंच फुल HD+ TFT LCD डिस्प्ले आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 850 nits पीक ब्राइटनेस आहे. हा फोन Android 14 वर आधारित MagicOS 8.0 वर चालतो आणि यात 5,200mAh बॅटरी आहे, जी 35W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z10x
iQOO Z10x मध्ये 6.72-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले असून, यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,050 nits पीक ब्राइटनेस आहे. हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरवर चालतो, जो 6GB/8GB LPDDR4x RAM आणि 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेजसह जोडलेला आहे.
याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, मागील बाजूला 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे, तर फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. या फोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Infinix Note 50s 5G+
या फोनमध्ये 6.78-इंच फुल HD+ 3D कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 nits पीक ब्राइटनेस आहे. यात MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर असून, तो Mali-G615 MC2 GPU आणि 8GB LPDDR5X RAM सह जोडलेला आहे. स्टोरेजसाठी 128GB/256GB UFS 2.2 चा पर्याय मिळतो.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 64MP Sony IMX682 प्रायमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे, तर फ्रंट कॅमेरा 13MP चा आहे. याची 5,500mAh बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Tecno Pova 7
Tecno Pova 7 मध्ये 6.78-इंच फुल HD+ LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे आणि हाय ब्राइटनेस मोडमध्ये 900 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसरवर काम करतो, जो 8GB LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेजला सपोर्ट करतो. यात 50MP चा प्रायमरी मागील कॅमेरा, एक दुय्यम सेन्सर आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. याची मोठी 7,000mAh बॅटरी जास्त काळ वापर सुनिश्चित करते.
Oppo K13 5G
Oppo K13 5G मध्ये 6.67-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले असून, तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 nits पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 4 SoC वर चालतो आणि यात 8GB LPDDR4x RAM सह 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेजचा पर्याय मिळतो. या सर्व फोन्सची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
हे देखील वाचा – भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणते 20 संघ खेळणार? वाचा संपूर्ण यादी