ST Mahamandal Recruitment: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC Recruitment 2025) तब्बल 17,450 चालक आणि सहाय्यक पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर केली आहे.
भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी (Maharashtra Bus Driver Jobs) आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, येत्या 2 ऑक्टोबर रोजी त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
3 वर्षांसाठी कंत्राटी भरती, किमान वेतन 30,000 रुपये
एसटी महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, बससेवा अधिक सुरळीत आणि दर्जेदार ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने 3 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. यासाठी ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार राबवण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान 30,000 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. तसेच, महामंडळातर्फे त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल.
गेल्या काही वर्षांपासून एसटीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत होता. या भरतीमुळे तो कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
नुकतेच राज्य सरकारने पोलीस भरतीलाही मंजुरी दिली होती, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच धर्तीवर एसटीमधील या भरतीने हजारो तरुणांसाठी रोजगाराची नवीन संधी निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी होतकरू तरुणांनी तयार राहावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.
हे देखील वाचा – Navratri 2025 Colours: नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा संपूर्ण यादी