Home / लेख / ‘ॲपल’च्या इतिहासातील दुर्मिळ चेकचा तब्बल 72 लाखांना लिलाव; जाणून घ्या काय आहे खासियत

‘ॲपल’च्या इतिहासातील दुर्मिळ चेकचा तब्बल 72 लाखांना लिलाव; जाणून घ्या काय आहे खासियत

Steve Jobs Signed Check: तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी ॲपलचे (Apple) सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या स्वाक्षरीचा एक जुना चेक...

By: Team Navakal
Steve Jobs Signed Check

Steve Jobs Signed Check: तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी ॲपलचे (Apple) सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या स्वाक्षरीचा एक जुना चेक नुकताच विकला गेला आहे. विशेष म्हणजे या चेकची लाखो रुपयांनी विक्री झाली आहे.

एका लिलावात हा चेक 87,940 डॉलर (सुमारे 72,83,723 रुपये) मध्ये विकला गेला. हा तोच चेक आहे जो त्यांनी, स्टीव्ह वॉझनियाक आणि रोनाल्ड जी. वेन यांच्यासह ॲपल कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज करण्याच्या चार दिवस आधी लिहिला होता.

चेकची खासियत काय आहे?

हा चेक वेल्स फार्गो बँकेचा असून, यातून पॅसिफिक टेलिफोनला 47.50 डॉलरचे पेमेंट करण्यात आले होते. हा चेक नंबर 6 होता. विशेष म्हणजे, यापूर्वी RR Auction ने विकलेल्या चेक नंबर 2 ते 5 मध्ये अशी माहिती नव्हती.

या चेकच्या मागे जॉब्स, वॉझनियाक आणि वेन यांची नावे लिहिलेली आहेत. यासोबतच त्या ॲन्सरिंग सर्व्हिसचा पत्ता देखील आहे, जो कंपनीने सुरुवातीला जॉब्सच्या गॅरेजमधून काम करताना वापरला होता. नावांपुढे “DBA Apple Computer Company” असे लिहिलेले आहे.

ही नोंदणी बँकेच्या टेलरने केली होती, जेणेकरून चेक बाऊन्स (bounce) झाल्यास तो कोणाचा आहे, हे कळू शकेल.

कंपनी सोडणारे रोनाल्ड वेन

रोनाल्ड वेन यांनी 12 एप्रिल 1976 रोजी ॲपल कंपनी सोडली होती. जॉब्स कंपनीला खूप धोकादायक स्थितीत आणत आहेत अशी त्यांना भीती वाटली होती. वेन यांना कंपनीचे 10% शेअर्स मिळाले होते, पण ते केवळ 800 डॉलरमध्ये विकून ते बाहेर पडले. नंतर याच शेअर्सची किंमत अब्जावधींमध्ये झाली.

जॉब्सच्या स्वाक्षरीची मागणी

RR Auction ने आतापर्यंत स्टीव्ह जॉब्सच्या स्वाक्षरीचे 17 चेक विकले आहेत. त्यांची सरासरी किंमत 85,128 डॉलर एवढी आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कामाच्या वेळेत बदल, ओव्हरटाइम वाढणार; महाराष्ट्र सरकारचा खासगी कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव

हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या

‘… म्हणून अमित शाह पुढील 50 वर्ष सत्तेत राहण्याचा दावा करतात’; ‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींची जोरदार टीका

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या