Tata Harrier and Safari Petrol Price : टाटा मोटर्सने आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत लोकप्रिय एसयूव्ही Tata Harrier आणि Tata Safari चे पेट्रोल इंजिन मॉडेल भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहेत. आतापर्यंत या दोन्ही गाड्या केवळ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध होत्या, मात्र पेट्रोल एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
नवीन पेट्रोल इंजिनची ताकद
टाटाने या दोन्ही गाड्यांमध्ये 1.5 लिटरचे नवीन टर्बो-पेट्रोल (T-GDI) इंजिन दिले आहे. हे इंजिन 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, ग्राहकांना यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन शहरात चालवताना वेगवान आणि हायवेवर प्रवासासाठी अत्यंत आरामदायक अनुभव देते.
किंमत किती?
टाटा हॅरियर पेट्रोलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.89 लाख रुपये आहे, तर टाटा सफारी पेट्रोलची सुरुवात 13.29 लाख रुपयांपासून होते.
Tata Harrier पेट्रोल (निवडक व्हेरियंट्स):
- Smart (मॅन्युअल): 12.89 लाख रुपये
- Adventure X (ऑटोमॅटिक): 18.47 लाख रुपये
- Fearless Ultra Red Dark (ऑटोमॅटिक): 24.69 लाख रुपये
Tata Safari पेट्रोल (निवडक व्हेरियंट्स):
- Smart (मॅन्युअल): 13.29 लाख रुपये
- Accomplished X (ऑटोमॅटिक): 22.50 लाख रुपये
- Accomplished Ultra Red Dark (6-सीटर ऑटोमॅटिक): 25.20 लाख रुपये
इंटीरियर आणि नवीन फीचर्स
पेट्रोल मॉडेल्समध्ये काही प्रीमियम बदल करण्यात आले आहेत. हॅरियर पेट्रोलमध्ये पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे नवीन ड्युअल-टोन इंटीरियर दिले आहे, तर सफारीमध्ये पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची रॉयल थीम पाहायला मिळते.
- डिस्प्ले: मोठा 14 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले.
- आराम: व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-झोन ऑटो एसी.
- ऑडिओ: डॉल्बी ॲटमॉससह जेबीएल साऊंड सिस्टम.
- इतर: वायरलेस चार्जर, 65W फास्ट युएसबी चार्जिंग आणि डिजिटल आयआरव्हीएम.
सुरक्षा आणि डिझाइन
सुरक्षेसाठी या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि लेवल-2 ADAS यांसारखी प्रगत फीचर्स दिली आहेत. डिझाइनमध्ये फारसा बदल नसला तरी, यामध्ये ‘नाइट्रो क्रिमसन रेड’ हा नवीन रंग आणि लोकप्रिय ‘रेड डार्क एडिशन’ पुन्हा सादर करण्यात आली आहे.









